Team Agrowon
पशुधनाचे संगोपन करीत असताना जवळपास ४० ते ४२ टक्के जनावरांना जंताचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो.
जंत हे परजीवी प्रकारातले असून, ते जनावरांच्या शरीरात राहून स्वतःचे पोषण करीत असतात. परिणामी जनावरांचे पोषण व्यवस्थित न होता, त्यांची प्रकृती ढासळू लागते.
जनावरांनी खाल्लेल्या अन्नाचे योग्यरित्या पचन होत नाही. हे जंत किंवा कृमी जनावरांच्या आतड्यांमध्ये राहत असल्याने, तेथून सर्व पोषक घटकांचे शोषण करतात.
वासरांमध्ये प्रामुख्याने गोलकृमीची बाधा दिसून येते. यासाठीचा पहिला डोस वासरू दहा दिवसाचे असताना द्यावा. त्यानंतर पुढे सहा महिने वयापर्यंत प्रत्येक महिन्याला जंताचा डोस द्यावा. मोठ्या जनावरांमध्ये वर्षातून साधारणपणे तीन वेळेस चार महिन्याच्या अंतराने जंत निर्मूलनाचा डोस दिला पाहिजे.
हे कृमी जनावरांच्या यकृतामध्ये जाऊन बसतात. वर्षातून दोन वेळेस म्हणजे पहिला डोस पावसाळ्यापूर्वी आणि दुसरा डोस पावसाळा संपल्यानंतर द्यावा. यकृतातील कृमींमुळे यकृताची कार्यक्षमता कमी होऊन प्रथिनांचा ह्रास होतो. त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊन रक्त तयार करणाऱ्या पेशीचा नाश होते. परिणामी जनावरांना रक्तक्षय होतो.
वर्षातून दोन वेळेस जानेवारी आणि जून महिन्यामध्ये वासरांसाठी याचे औषध द्यावे. मोठ्या जनावरांना पट्टकृमीसाठी औषध देऊ नये.
गोठ्यातील जनावरांच्या अंगावरील गोचीड व गोमाशी यांपासून संरक्षण करण्यासाठी नियमित कीटकनाशकांची फवारणी करावी.