
आपल्या ग्रामीण भागात कृषी संस्कृतीत (Indian Agriculture) आजही बुवा- बाबांचा प्रचंड पगडा आहे. बुवा-बाबा तुमच्या मानसिकतेशीच (Human Psychology) खेळतात. पण आपण त्यांच्याकडे मोठ्या श्रद्धेने जातो. आपल्याकडे काही घटना घडल्या, आपलं नुकसान झालं, तर त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. आपण खचतो. आपल्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. बहुदा आपल्याच चुकीच्या निर्णयाने अपयशाची साखळीच आपल्या समोर उभी राहते. त्या वेळी सगळं गणित बिघडतं आपलं, कुटुंबाचं. त्याने आपल्या सगळ्यांच्याच मानसिकतेवर परिणाम होतो आणि आपण कुठल्याही घटनांचा कुठेही संबंध लावतो. आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नीट सापडत नाही.
आय.पी.एच.मधून फोन आला. डॉ. आनंद नाडकर्णी हे शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर एक सीरिज करताहेत- कर्ता शेतकरी. त्याचा ‘सूत्रधार’ म्हणून आपण काम कराल का? आम्हाला शेतकरी आणि अभिनेता असा द्विअंगी माणूस अपेक्षित आहे. वास्तविक पाहिलं तर शेतकऱ्याला अभिनय करताच येत नाही. तो वास्तवातच जगतो. त्याच्या समोर कित्येक व्यापारी, अधिकारी, राजकारणी अभिनय करतात. त्याच्यासाठीच्या मोठमोठ्या बाता मारतात. एवढंच काय सामान्य माणूससुद्धा त्याच्या उत्पादनाकडे बोट करून महागाई महागाई म्हणून जोरजोरात बोंबलतो. आणि स्वतः करत असलेल्या कामाचा वाढवून मोबदला मागतो. आणि हा बिचारा फसतो. शेतकऱ्यानंही अभिनेता व्हावं किमान आपलं जगणं जसंच्या तसं पटावर मांडण्यापुरतं का होईना. म्हणून मी तो गुण थोडा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि मी आतापर्यंत दोन्ही गुण अंगात धरून ठेवण्याचा प्रयत्न केला.
मी नाडकर्णी सरांबद्दल जाणून होतो. ते एक जागतिक कीर्तीचे मानसोपचार तज्ज्ञ आहेतच, त्याच बरोबर ते चांगले लेखक पण आहेत. सामाजिक अंगाने ते एक चळवळच चालवतात. माझी आणि त्यांची ‘वेध'मध्ये प्रत्यक्ष भेट झालेली. अफाटच माणूस. हे मला माहीत असतानाही आपल्या मनात जी शंका आणि संशय नावाची जुळी भावंडं राहतात, त्यातल्या एकानं डोकं वर काढलं आणि मी हलकासा विचलित झालो. अरे, ते तर वेड्याचे डॉक्टर ना? म्हणजे अजून ही लोकं शेतकऱ्यांना वेड्यात काढायचे बंद झाले नाही की काय ?
कारण वेड्याच्या डॉक्टरांचं पेशंट म्हणजे पूर्वी जसे सामाजिक संकेत न पाळल्यावर तुम्हाला बहिष्कृत केलं जायचं अगदी तसंच लोक आज मानसिक आरोग्य बिघडलेल्या लोकांना करतात. म्हणजे डॉक्टरांना सगळेच शेतकरी आपले पेशंट आहेत असं तर वाटत नसेल ना? आपल्याकडं येरवड्याचं हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. याला येरवड्याला पाठवा म्हटलं की झालं. मराठवाड्यात डॉ. बाऱ्हाळे प्रसिद्ध आहेत. त्यांचा पेशंट हा शब्द प्रचलित आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या अंगाने पेशंट असतेच; पण आपण त्याची चौकशी करत नाही. उलट त्यांच्या या गोष्टीची खिल्ली उडवतो.
आब्या नान्याला म्हणाला, याच्या गोळ्या उडाल्यात काय रे... असं म्हटलं की आपल्या समोर जी प्रतिमा उभी राहते ती म्हणजे....
(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)
अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.
अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -
अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.