Water-Rich Village : जलसमृद्ध गाव आराखडा कसा करावा?

Water-Rich Village Plan : महाराष्ट्रातील अनेक गावे जलसमृद्ध झाल्याने संपन्न झालेली आहेत आणि त्या ठिकाणी समृद्धी आहे हेही सिद्ध होते आहे.
Village Water Management
Village Water ManagementAgrowon

Village Water Management : गावाचा शाश्‍वत विकास हा जलसमृद्ध गावाच्या भोवती केंद्रीभूत झालेला आहे. उदाहरणार्थ गरिबी निर्मूलन, हगणदारीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, दर्जेदार शिक्षण, लिंग समभाव, शुद्ध पाणी स्वच्छता, सन्मान जनक रोजगार आणि आर्थिक विकास, मूलभूत सुविधा, विषमता निर्मूलन, शाश्‍वतशहरे आणि समुदाय, जबाबदार उपभोग आणि निर्मिती, पर्यावरण, पाण्याखालील जीवन, जमिनीवरील जीवन असे सुमारे १५ शाश्‍वत विकासाच्या ध्येय एकत्र करून जलसमृद्ध गाव हा विषय तयार करण्यात आलेला आहे.
       

जल समृद्ध गाव याबाबत या विषयावर अभ्यास करत असताना आणि आराखडा करत
असताना काही बाबी विचारात घ्याव्या लागतील. गाव जल जलसमृद्ध असल्यास सतरा
शाश्‍वत विकासाच्या ध्येयांपैकी पंधरा शाश्‍वत विकासाची ध्येय पूर्ण होतात म्हणजे गाव जलसमृद्ध असेल तर सकृतदर्शनी दिसणारे आणि काही अदृश्य प्रश्‍नदेखील जलसमृद्ध गावाच्या माध्यमातून सुटतात असे सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्रातील अनेक गावे जलसमृद्ध झाल्याने संपन्न झालेली आहेत आणि त्या ठिकाणी समृद्धी आहे हेही सिद्ध होते आहे.

दूरदृष्टी
        गावातील सर्वांसाठी वैयक्तिक नळ जोडणी आणि दर्जेदार पाणीपुरवठा, उत्तम
पाणी व्यवस्थापन, शेती आणि पाण्याच्या गरजा पूर्ण होतील इतकी मुबलक
पाण्याची उपलब्धता, पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचे पुनर्भरण याद्वारे जल
परिसंस्था चिरंतन कराव्यात.
        सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या विश्‍वस्तांनी नियोजन करत असताना जलसमृद्ध
गाव करण्यासाठी घरगुती पाणी वापर, चालू असलेले शौचालय, बाजाराचे ठिकाण,
प्रत्येक घरामध्ये देखील कार्यात्मक शौचालय, सामाजिक संस्था आणि आरोग्य
केंद्र येथेही पाणी असणे गरजेचे आहे.
       

Village Water Management
Village Water Management : गाव जल आत्मनिर्भर करा...

कृषी आणि संलग्न उपक्रमामध्ये पाण्याचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. स्वच्छतेसाठी पाणी आवश्यक आहे. गावामध्ये गावाच्या परिक्षेत्रात असणाऱ्या उद्योग व्यवसायांना देखील पाण्याची उपलब्धता होणे गरजेचे आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून गावातील जल परिसंस्था ही समृद्ध होणे गरजेचे आहे. स्थानिक उद्दिष्टे आणि लक्ष सर्वांसाठी पुरेसे स्वच्छ पाणी आणि पिण्या योग्य पाणी सुविधांची उपलब्धता.

गावांमध्ये स्वच्छता सुविधा उपलब्धता. घरगुती शौचालयाचा शंभर टक्के वापर सुनिश्‍चित करणे. सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण यंत्रणा विकसित करणे. १०० टक्के हगणदारीमुक्त गाव करणे. भूजल पुनर्भरण करणे आणि प्रदूषकांमुळे होणारे पाणी प्रदूषण थांबवणे. पावसाच्या पाण्याचे संकलन करणे आणि भूजल पुनर्भरण करणे यावर लक्ष देणे. नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनाद्वारे परिसंस्थेचे रक्षण करणे.

ग्रामपंचायतीची भूमिका प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी
        पाणी आणि स्वच्छता विषयक साधन संपत्तीचा अर्थात जलसंपत्तीचा योग्य वापर
आणि त्याचे व्यवस्थापन करणे यासाठी गावातील प्रमुख आणि  सर्व कुटुंबांना शिक्षित करणे. यासाठी ग्रामविकास आराखड्यामध्ये जल साक्षरतेच्या प्रशिक्षणासाठी तरतूद करणे आवश्यक राहील.

Village Water Management
Tantamukt Village : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला मरगळ

स्वच्छतागृह
        शाळा आणि अंगणवाडीमध्ये मुला-मुलींसाठी पुरेशा आणि कार्यरत स्वच्छता
गृहांची उपलब्धता असावी. बाजार आणि ग्रामपंचायत आवारासह सार्वजनिक ठिकाणाच्या स्वच्छतागृहांची देखभाल सुनिश्‍चित करावी. बऱ्याच ठिकाणी असे पाहावयास मिळते की
स्वच्छतागृहे तर उभारलेली आहे, परंतु नियमित देखभालीच्या अभावी ती स्वच्छतागृहे ही अतिशय खराब अवस्थेमध्ये आणि निरुपयोगी झालेली आढळतात.

पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन योग्य तंत्रज्ञानाची निवड करून त्याचा वापर करावी. उदाहरणार्थ, शोषक खड्डे, परसबाग, मॅजिक पीट इत्यादी. पुरेसा पाणीपुरवठा पिण्याचे पाणी आणि पाण्याची विश्‍लेषण सुनिश्‍चित करण्यासाठी संबंधित यंत्रणांची संपर्क साधने विकसित करावी.

ग्राम विकास समित्या बळकटीकरण

अस्तित्वात असलेल्या आणि तयार केल्या जाणाऱ्या सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास समिती स्थापना आणि त्यांची क्षमता वृद्धी करावी. आधुनिक शेती आणि अत्याधुनिक पाणी वापर तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. जलस्रोतांचे रक्षण करणे आणि पाण्याच्या गुणवत्तेचे सातत्याने नियमन करावे. पिण्याच्या पाणीपुरवठा यांच्या पायाभूत सुविधांची देखभाल
करण्यासाठी नियतकालिक देखभालीची योजना तयार करावी.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४९ अन्वये आवश्यक तेवढ्या ग्रामविकास समित्या ग्रामपंचायतीद्वारे स्थापन करण्यात येऊ शकतात. या कायद्याचा उपयोग करून पाणी आणि स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या ग्राम समितीची स्थापन करावी. उदाहरणार्थ, जलसाक्षरता आणि जल व्यवस्थापन समिती या नावाने ग्रामविकास समिती स्थापन करून कलम ४९ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या सदस्यांची निवड त्यामध्ये करून या समस्यांना सर्व समृद्ध आणि निरोगी गावासाठी तसेच सर्व समावेशक
नियोजनासाठी सहभागी होणाऱ्या व्यक्तींची क्षमता बांधणी करण्याची निश्‍चिती करावी. यामध्ये गावातील तरुण, सेवानिवृत्त नागरिक, शेतकरी आणि स्वयंसाह्यता गटातील महिला, यांना नियमितपणे प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.
       

प्रशिक्षणासाठीची तरतूद पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये करणे आवश्यक ठरेल. प्रशिक्षण दर्जेदार असणे गरजेचे राहील. या समित्यांच्या बैठका नियमित होत असल्याची सुनिश्चित करणे आणि ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये आणि ग्रामसभेमध्ये या समित्यांचा अहवाल नियमितपणे घेण्यात यावा. याच समवेत काही विना खर्चाच्या किंवा अल्प खर्चाच्या बाबी नियमितपणे करता येतील.

उदाहरणार्थ, पाण्याची संबंधित समस्यांवर जनजागृती उपक्रम आयोजित करावेत. तपासणीसाठी पाण्याचे नमुने गोळा करणे आणि पाणी तपासणी प्रयोग शाळेकडे पाठवावे. पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत, जसे की विहीर, तलाव, झरे, डोह
इत्यादींचे चिन्हीकरण करावे. या योजना शाश्‍वत राहाव्यात यासाठी आणि नियमितपणे सुविधा त्यांना अबाधितपणे उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक कुटुंबाकडून पाणी पट्टी शुल्क संकलन करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com