Poultry Management : कशी ओळखायची कोंबड्यांतील खनिज कमतरतेची लक्षणे

विविध खनिजांच्या कमतरतेमुळेही बऱ्याचवेळा कोंबड्यांमध्ये आजार व समस्या निर्माण होतात.
Poultry Management
Poultry ManagementAgrowon
Published on
Updated on

व्यावसायिक कुक्कुटपालनात (Poultry) बाजारपेठेतील उपलब्ध  संतुलित कोंबडी खाद्याचा (Poultry Feed) वापर केला जातो. पण परसबागेतील कोंबड्यांना शक्यतो शिल्लक भाजीपाला, धान्य, उपलब्ध वनस्पती खाण्यासाठी दिल्या जातात. यामधून सर्व पोषणतत्त्व कोंबड्यांच्या शारीरिक गरजेनुसार मिळतीलच असे नाही. विविध पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे कोंबड्यांमध्ये अनेक आजार उद्भवण्याची भिती असते. असे आजार कधी कधी व्यावसायिक कुक्कुटपालनामध्येही आढळून येतात. कोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची कार्ये करीत असतात. अंड्याचे कवच तयार करणे, हाडे मजबूत करणे, शरीराची वाढ, रक्त तयार होण्याचे कार्य विविध खनिजांमुळे घडत असते. विविध खनिजांच्या कमतरतेमुळेही बऱ्याचवेळा कोंबड्यांमध्ये आजार व समस्या निर्माण होतात. या आजार आणि समस्यांविषयी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.

Poultry Management
Poultry Management : ब्रॉयलर कोंबड्यांच्या पिलांची निवड कशी करावी ?

कोंबड्यातील खनीज कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची

कॅल्शिअम च्या कमतरतेमुळे पातळ कवचाचे किंवा कवचहीन अंडे तयार होतात. अंडी उत्पादन आणि अंडी उबवणीचे प्रमाण कमी होते तसेच कोंबड्यांची वाढ खुंटते. 

स्फुरद (फॉस्फरस) च्या कमतरतेमुळे हाडे नाजूक व ठिसूळ होतात. अंडी उत्पादन कमी होऊन वाढ खुंटते. 

भूक मंदावणे, अंग थरथरणे, पाय जड होणे, त्वचा खरबरीत व जाड होणे इ. लक्षणे मॅग्नेशिमच्या कमतरतेमुळे अढळून य़ेतात. 

मॅंगेनीज च्या कमतरतेमुळे पाय बाहेरील बाजूस वळतात, पायाला सूज येते, पातळ कवचाचे किंवा कवचहीन अंडे, अंडी उबवणीचे प्रमाण कमी होते.

Poultry Management
Poultry Farming : अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे व्यवस्थापन

झिंक कमतरतेमुळे पंखाची वाढ कमी होते, पायाची हाडे आखूड होतात व पायाचा जॉईंट सुजतो.  

लोह, कॉपर च्या कमतरतेमुळे कोंबड्यांना रक्तक्षय होतो व पंखाचा रंग बदलतो.  

मांसल भागावर पांढरे पट्टे दिसने, मांसामध्ये रक्ताचे डाग दिसने इ. लक्षणे सेलेनिअमच्या कमतरतेमुळे दिसून येतात.

सोडियम व पोटॅशिअम च्या कमतरतेमुळे चोचीची वाढ होत नाही.  

या लक्षणांवरुन कोंबड्यातील खनिज कमतरतेची लक्षणे ओळखावीत आणि कोंबड्यांवर तज्ज्ञांकडूल वेळीच उपचार करावेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com