Importance Of Sulfur : पीकवाढीसाठी गंधक कसे उपयुक्त आहे?

शेतजमिनीच्या वरच्या थरात गंधकाचे प्रमाण जास्त असते. एकूण गंधकाच्या प्रमाणाच्या अगदी थोड्या प्रमाणात जमिनीत गंधक द्रवस्वरूपात असते. त्यातून पिके गंधकाची गरज भागवितात.
Importance Of Sulfur
Importance Of Sulfur Agrowon
Published on
Updated on

कडधान्य, गळीत धान्य, तृणधान्य, भाजीपाला, फळ भाज्या, फुलझाडे, ऊस, कापूस , केळी, द्राक्षे यासारखी नगदी पिकात निव्वळ गंधकाच्या वापराने १५ ते २५ टक्के उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

गंधकाच्या वापरामुळे गळिताच्या पिकांमध्ये सरासरी २ ते ११.३ टक्यांपर्यंत तेलाचे प्रमाण वाढते.

पीक पोषक अन्नद्रव्यांव्यतिरिक्त जमीन सुधारक म्हणूनही गंधकाचा उपयोग होतो.गंधक हे अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य असून जमिनीत त्याचे सरासरी प्रमाण ०.०६ ते ०.१ टक्के असते.

परंतु काही वेळा शेत जमिनीत एकूण गंधकाचे प्रमाण २० पीपीएम पासून हजारो पीपीएम इतके असू शकते. बऱ्याच शेतजमिनीत हे प्रमाण ५० ते ५०० पीपीएम या प्रमाणात आढळते.

सर्वसाधारणपणे शेतजमिनीत हे प्रमाण गंधक खनिज पदार्थ व सेंद्रिय स्वरूपात असतो. गंधक हे जमिनीच्या सर्व थरातून आढळते.

परंतु शेतजमिनीच्या वरच्या थरात गंधकाचे प्रमाण जास्त असते. एकूण गंधकाच्या प्रमाणाच्या अगदी थोड्या प्रमाणात जमिनीत गंधक द्रवस्वरूपात असते. त्यातून पिके गंधकाची गरज भागवितात.

पीकवाढीच्यादृष्टीने गंधकाचे कार्य

१. गंधक हरित द्रव्याचे घटक नसले तरी वनस्पतीच्या पानातील हरित द्रव्य तयार करण्यास मदत करते.

२. अनेक प्रथिने व पाचकरस तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग. मोहरीच्या तेलासारख्या उडून जाणाऱ्या संयुक्त पदार्थांचा आवश्यक घटक.

३. तेलबिया पिकात तेलाचे प्रमाण सरासरी २ ते ११ टक्क्यांनी वाढण्यास मदत.

४. कांदा,लसणामध्ये तिखटपणा वाढतो.

५. फळे व भाजीपाला पिकांचा रंग आकर्षक, गुणवत्ता सुधारते.

Importance Of Sulfur
Aloe vera Cultivation : कसे आहे कोरफड लागवडीचे तंत्र?

६. चारा व चारा पिकात नत्र: गंधक गुणोत्तराचे प्रमाण कमी करून त्याचे पोषणमूल्य आणि प्रतवारीत सुधारणा.

७. तृणधान्य पिकाची प्रत सुधारते.

८. उसाच्या रसाची प्रत सुधारते, साखरेचे प्रमाण व उतारा वाढण्यास मदत.

९. मुळांची वाढ, बीजधारणा आणि मुळांवरील गाठी बनविण्यास उत्तेजन.

१०. जमिनीचा सामू कमी करणे तसेच अल्कधर्मी, चुनखडीयुक्त व चोपण जमिनी सुधारण्यास मदत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com