Team Agrowon
स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा.
हे पीक हलक्या, वालुकामय, उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगले येते.
लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा ६० ते ७५ सें. मी. अंतरावर सरी- वरंबे तयार करावेत.
कोरफडीची अभिवृद्धी मुनव्यांपासून करतात.
पावसाळा सुरू होताच लागवड करावी. या पिकास माती परीक्षणानुसार खतमात्रा द्यावी.
पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा.
लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.