पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांना पाण्याचा ताण बसत आहे. आडसाली उसाची लागवड (Sugarcane) नुकतीच झालेली आहे. उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. आडसाली उसासाठी हेक्टरी ३२५ ते ३५० लाख लिटर पाण्याची गरज असते. साधारणपणे ३८ ते ४० पाण्याच्या पाळ्या लागतात. दोन पावसाळ्यामुळे आठ ते दहा पाणी कमी लागते. ठिबक सिंचन पद्धतीमुळे ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. तर उत्पादनात २० टक्के वाढ, खतामध्ये सुद्धा २५ टक्के बचत होते. उस पिकातील पाणी व्यवस्थापनाविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील माहिती देली आहे.
पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन कसे कराल?
- मातीची भौतिक तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूस पोहोचत असल्याने ओलावा तपासून खात्री करावी.
- अति पाणी हे ऊस तसेच साखरेचे उत्पादन घटवते. सौम्य प्रमाणात पाण्याचा ताण ऊस उत्पादन वाढविते.
- फुटवे फुटण्याच्या वेळेस जर जास्त पाणी दिले तर मुळाजवळ हवेचे प्रमाण कमी होते. फुटवे कमी निघतात. उसाची उंची तसेच कांड्यांची लांबी वाढणे गरजेचे असते. कारण यामध्ये साखर साठवली जाते. उसाचे वजन वाढते.
- उगवणी अवस्था तसेच कोंब स्थिर होण्याच्या कालावधीत हलके परंतु वारंवार पाणी देणे महत्त्वाचे आहे.
- सुरुवातीच्या काळात जमीन फक्त ओली असणे महत्त्वाचे आहे. जमिनीत हवा खेळती असावी.
- सुरुवातीच्या काळात पाण्याचा ताण असेल तर जमीन कोरडी राहते. त्यामुळे उगवन उशिरा आणि कमी प्रमाणात होते.
- पाण्याचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास शेतात पाणी उभे राहिल्यास उसावरील डोळे कुजतात तसेच उगवून आलेले कोंबही मरतात. उगवणीचे प्रमाण कमी राहते. यामुळे पुढे जाऊन अपेक्षित ऊस संख्या मिळत नाही.
- आडसाली उसासाठी सरी वरंबा पद्धतीने लागवड केली असल्यास उसाची पाण्याची गरज इतर पिकांच्या तुलनेत जास्त असते. तरीही ऊस पिक इतर पिकांच्या तुलनेत पाण्याचा ताण बऱ्यापैकी सहन करते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.