Stored Grain Pest : साठवलेल्या धान्यातील किडींचे रासायनिक नियंत्रण

मागील लेखामध्ये भुंगेरा किडीची ओळख, जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार आणि पारंपरिक व्यवस्थापन पद्धतींसह रसायन विरहित उपायांबाबत माहिती घेतली. आजच्या भागात कीड नियंत्रणासाठीच्या रासायनिक उपायांबाबत माहिती घेऊ.
Storage Grain Pest
Storage Grain PestAgrowon
Published on
Updated on

रश्मी भोगे, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. व्ही. आर. शेलार

मागील लेखामध्ये भुंगेरा किडीची ओळख, जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार आणि पारंपरिक व्यवस्थापन पद्धतींसह रसायन विरहित उपायांबाबत माहिती घेतली. आजच्या भागात कीड नियंत्रणासाठीच्या रासायनिक उपायांबाबत माहिती घेऊ.

Storage Grain Pest
Stored Pulses Pest : साठवणुकीतील कडधान्यांचे भुंगेरा किडीपासून संरक्षण

धुरीजन्य औषधे

ॲल्युमिनिअम फॉस्फइडच्या (१५ टक्के) ३ गोळ्या (१२ ग्रॅम वजनाच्या) प्रति टन कोठारातील बियाण्यास ५ ते ७ दिवस धुरीकरणासाठी ठेवल्यास कडधान्याच्या भुंगेऱ्याचा नाश होतो.

या बियाण्याचे किंवा कोठारातील जागेचे धुरीकरण करावयाचे असल्यास ते हवाबंद असावे.

धुरीकरणानंतर प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री हळूवार काढावी. धुरीकरण केलेल्या बियाण्याचा वापर ४८ तासांनंतर करावा.

मोठ्या प्रमाणात साठविलेल्या बियाण्याचे धुरीकरणासाठी, बियाणे साठवणूक कोठारात, इथिलीन डायक्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड ३:१ व्ही/व्ही या धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर ३०० ते ४०० ग्रॅम प्रति घनमीटर जागेसाठी किंवा १५० ग्रॅम प्रति घनमीटर जागेसाठी करावा.

Storage Grain Pest
Tur Pest Management : तूर पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

धुरीकरणानंतर प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री हळूवार काढावी. बियाण्यांस ४८ ते ७२ तासांपर्यंत धुरीकरण करावे. रिकाम्या कोठारासाठी धुरीकरण ७ दिवसांपर्यंत करावे. धुरीकरण केलेल्या बियाण्याचा वापर ४८ तासांनंतर करावा.

(टीप ः धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर शासनमान्य अधिकृत परवानाधारक धुरीकरण यंत्रणेमार्फतच करावा अन्यथा जीवितास धोका उद्भवू शकतो.)

- रश्मी भोगे, ९९२१३७२७९३

(सहायक बियाणे संशोधन अधिकारी)

(डॉ. पाटील हे कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख, तर डॉ. शेलार हे बियाणे संशोधन अधिकारी म्हणून बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

जि.नगर येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com