हे ढगसुद्धा विरून जातील...

तुलना हे ही दुःखाचं आणखी एक कारण असतं. तुलना केल्यामुळे आपण आनंदाला हरवून बसतो. प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येकातल्या क्षमता वेगळ्या असतात. मग आपण का तुलना करतो ?
Happy Thoughts
Happy ThoughtsAgrowon

ज्योती आधाट/तुपे

आनंद द्याल तर आनंद मिळेल, दुःख द्याल तर दुःख. प्रेम द्याल तर प्रेम, सुख द्याल तर सुख. जे जे आपण देऊ ते ते आपल्याला परत मिळतं. मग आपल्याला सगळं छान हवं असेल तर आपणही इतरांना छान देऊयात. दुसऱ्‍यांना आनंदी बघायला आवडणं हे निर्मळ आणि आरोग्यसंपन्न मनाचे (Healthy Mind) लक्षण आहे. पण आपल्या दुःखाचे मूळ कारण हे आपणच असतो.

Happy Thoughts
Crop Insurance : सबुरी नको, कारवाई हवी

माझ्यापेक्षा दुसरं कोणी आनंदी नको ही भावना आपल्यातलं नैराश्य वाढवते. तुलना हे ही दुःखाचं आणखी एक कारण असतं. तुलना केल्यामुळे आपण आनंदाला हरवून बसतो. प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येकातल्या क्षमता वेगळ्या असतात. मग आपण का तुलना करतो? स्वतःच्या मुला-मुलींच्या क्षमता ओळखून त्यांना पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे. पण आपण तुलना करून वेळ वाया घालवतो आणि मानसिक विकृतीला आवाहन करतो.

स्वतःमधली खरी शक्ती ओळखून जर त्याप्रमाणे वाटचाल केली तर, सकारात्मक विचारच मनात येतील. पण तसे न करता आपण माझ्याकडे हे नाही ते नाही, ही व्यक्ती माझ्याशी असेच का वागते, अशा अनेक प्रश्‍नांचे ओझे मनावर बाळगून आपण दररोज जगतो आणि आयुष्यातले सुंदर क्षण हरवून बसतो. ज्याला जसं वागायचं तसं वागू द्या. आपल्याला जे योग्य वाटेल, जे करायला आवडेल ते आपण करुयात. म्हणजे जगणं सुंदर होईल.

आपल्यावर कुठल्याचं परिस्थितीचा फरक पडू द्यायचा नाही. हे एकदा मनाशी ठरवलं, की मग पुढे सगळं सहज घडत जातं. काही करावे लागत नाही. अपेक्षा, तुलना, मत्सर, राग, द्वेष या गोष्टी मनाला वेदनादायी असतात. हे माहीत असूनही आपण या वेदना मनात ठेवून जगतो. ‘स्वतःचा शोध’ या पुस्तकात ओशोंनी खूप सुंदर अनुभव, विचार व्यक्त केले आहेत.

ओशो म्हणतात, की आनंदी राहण्यासाठी तुम्ही थोडीशीच शक्ती खर्च केलीत तर उरलेली शक्ती तुम्ही दुःखी राहण्यासाठी वापरणार हे उघड आहे. म्हणून प्रत्येक क्षण सर्व शक्तीनिशी आनंदानं जगा! असं जगा की दुःखासाठी ताकदच उरणार नाही. आणि समजा दुःखाचे काही ढग येत आहेत असं वाटलं तरी त्याकडे दुर्लक्ष करा कारण प्रत्येक गोष्ट येते तशीच निघून जात असते. म्हणूनच हे ढगसुद्धा विरून जातील. विनाकारण काळजी का करायची? ते कशा पद्धतीनं निघून जात आहेत हे फक्त त्यांना ओळख न देता पाहत राहा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com