Goat Farming : शेतकरी नियोजन : शेळीपालन

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा अवर्षणप्रवण आहे. येथे सिंचनाच्या पाण्याची ही मोठी टंचाई असते.
Goat Farming Management
Goat Farming ManagementAgrowon
Published on
Updated on

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा अवर्षणप्रवण (Precipitation Prone) आहे. येथे सिंचनाच्या पाण्याची ही मोठी टंचाई असते. या भागातील आदर्की बुद्रुक हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. या गावात शेतीला पूरक व्यवसाय (Supplementary Business) म्हणून दुग्ध व्यवसाय (Milk Business) मोठ्या प्रमाणात केले जाते.

येथील सुनील महादेव धुमाळ यांची ३ एकर शेती आहे. त्यात अर्धा एकरावर चारा पिके आणि उर्वरित क्षेत्रामध्ये ऊस लागवड आहे. सुनील यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर घरच्या दुग्ध व्यवसायात लक्ष घालायचे ठरवले. वडिलांनी आणलेल्या वासरापासून वाढवलेल्या पाच गाईंपासून दुग्ध व्यवसाय सुरू झाला.

Goat Farming Management
GM Crop : पिकांच्या जीएम वाणांची वाटचाल कशी झाली?

गाईंसाठी लहानसा गोठा उभारला. दुधासह वासरे आणि शेणखत विक्रीतून बऱ्यापैकी अर्थार्जन होऊ लागल्याने गोठा हळूहळू वाढवत गेला. त्यावेळी गोठ्यामध्ये १२ गाई, चार म्हशी व दोन शेळ्या होत्या. मात्र, मागील काही वर्षांत दुधाला मिळणारा दर आणि जनावरांना लागणारे खाद्य यांचे गणित जुळत नव्हते. त्यामुळे गायींची संख्या कमी करून दुग्ध व्यवसाय पूर्णपणे थांबवून शेळीपालन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Goat Farming Management
PM Kisan : नको म्हटलं, तरी पीएम किसान सन्मान निधी घ्याच.

२०१९ मध्ये कोटा जातीच्या १० शेळ्या आणि १ नर आणत शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली. त्यानंतर मागील वर्षी बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथून बीटल जातीच्या ४ शेळ्या आणि कराड येथून १ नर आणला. सध्या त्यांच्याकडे कोटा जातीच्या १० शेळ्या आणि बीटल जातीचे ३ बोकड आणि ५ पिल्ले आहेत. व्यवस्थापनावर विशेष भर देत अपेक्षित वजन भरल्यानंतर शेळ्यांची विक्री केली जाते. शेळीपालनास ‘भैरवनाथ गोट फार्म’ असे नाव दिले आहे.

शेडची उभारणी ः

- शेळ्यांसाठी सुधारित पद्धतीने १५० बाय ७० फूट आकाराच्या मुक्तसंचार शेडची उभारणी केली. त्यातच बंदिस्त गोठा उभारला आहे.

- शेळ्या दिवसभर मुक्तसंचार गोठ्यात व रात्री बंदिस्त शेडमध्ये ठेवल्या जातात.

- बंदिस्त शेडमध्ये शेळ्या आणि बोकडांच्या वयानुसार शेडमध्ये वेगवेगळे कप्पे केले आहेत. लहान पिल्ले, शेळ्या, बोकड असे कप्पे करून त्यात संगोपन केले जाते.

चारा नियोजन ः

- अपेक्षित वजन मिळविण्यासाठी आरोग्य आणि खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर देणे आवश्यक असते. शेडमध्ये पुरेसे खाद्य शेडमध्येच उपलब्ध करून दिले जाते.

- शेळ्यांच्या अपेक्षित वाढीसाठी संतुलित खाद्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यानुसार हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे नियोजन केले जाते.

- सुक्या चाऱ्यामध्ये तूर, सोयाबीन किंवा घेवडा भुसकट, भरडा शेंगदाणा पेंड दिली जाते. तर ओल्या चाऱ्यामध्ये मका, संकरित नेपियर, हत्ती घास, मारवेल गवत, सुबाभूळ, मेथी यांची एकत्रित कुट्टी करून दिली जाते.

- सकाळी आणि संध्याकाळी साधारण २०० ग्रॅम सुका चारा प्रति शेळी दिला जातो. ओला चाऱ्याची कुट्टी साधारण २ किलो प्रमाणे दिला जातो. शेळ्यांच्या वजनानुसार चाऱ्याचे प्रमाण ठरविले जाते.

आरोग्य व्यवस्थापन :

- शेडमधील शेळ्यांना वर्षभर वेगवेगळे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. सर्व लसीकरण हे पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

- गाभण शेळीची विशेष काळजी घेतली जाते. पिल्ले जन्मल्यानंतर त्यांना व्यवस्थित स्वच्छ केले जाते. नाळ व्यवस्थित कापून त्या जागी आयोडीन लावले जाते. सुरुवातीचे १५ दिवस नवजात पिल्लांची विशेष काळजी घेतली जाते.

- प्रत्येक ३ महिन्यातून एकदा जंताच्या मात्रा दिल्या जातात.

व्यवस्थापनातील बाबी :

- दररोज सकाळी ७ वाजता बंदिस्त शेडमधून शेळ्या मुक्त संचार शेडमध्ये सोडल्या जातात. मुक्त संचार शेडमध्ये आधी सुका चारा आणि नंतर ओला चारा दिला जातो.

- त्यानंतर बंदिस्त शेडची स्वच्छता केली जाते.

- शेडमध्येच शेळ्यांना मुबलक स्वच्छ पाणी उपलब्ध केले जाते.

विक्री व्यवस्थापन :

व्यापारी शेडवर येऊन शेळी आणि बोकडाची वजनानुसार खरेदी करतात. साधारण ३ ते ५ महिन्यांच्या कोटा जातीच्या शेळ्यांची ८ हजार ते १४ हजार पर्यंत विक्री होते. बीटल जातीच्या बोकडांना मांसासाठी विशेष मागणी असते, असे सुनीलराव सांगतात.

- सुनील धुमाळ - ७३५०९७२३४०.

(शब्दांकन ः विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com