Soil Testing : कृषिदूतांकडून माती परिक्षणाविषयी प्रात्याक्षिक

माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती होते. त्यामुळे कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे सोयीचे होते. त्यासाठी माती परिक्षण अत्यंत आवश्यक असे कृषिदूतांकडून सांगण्यात आले.
Soil Testing
Soil TestingAgrowon
Published on
Updated on

देवळाली (जि. सोलापूर) ः येथे सद्‍गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव (जि.नगर) येथील कृषिदूतांतर्फे (Krushidoot) माती परीक्षण प्रात्यक्षिक (Soil Test Demonstration) आयोजन करण्यात आले. ग्रामीण कृषी कार्यानुभव (Agriculture Work Experience) कार्यक्रमांतर्गत कृषिदूत देवळाली (जि. सोलापूर) येथे कार्यरत आहेत. यावेळी शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणासंबंधी जनजागृती (Soil Test Awareness) होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

Soil Testing
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण; आयआयटी कानपूरचं संशोधन

माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती होते. त्यामुळे कमतरता असलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे सोयीचे होते. त्यासाठी माती परिक्षण अत्यंत आवश्यक असे कृषिदूतांकडून सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मातीमधील उपलब्ध घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कृषिदूत अमर जाधव, प्रसाद जाधव, सुयोग भाकड, प्रशांत पावणे, सचिन राठोड, शुभम पोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे, सागर खिलारे, राम खोसे, पूजा इनामके आदींचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com