Dal Mill Business : कमी भांडवलावर उभारा डाळ प्रक्रिया उद्योग

कमी भांडवलावर ग्रामीण भागात डाळ प्रक्रिया उद्योग स्थापन करून त्याद्वारे विविध डाळी व डाळीचे पदार्थ तयार केल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
Dal Mill Business idea
Dal Mill Business ideaAgrowon

Dal Mill Business Idea: कमी भांडवलावर ग्रामीण भागात डाळ प्रक्रिया उद्योग (Dal Processing Unit) स्थापन करून त्याद्वारे विविध डाळी व डाळीचे पदार्थ तयार केल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्या तसंच बेरोजगार तरुणांनी पुढाकार घेऊन डाळ मील उद्योग उभारण गरजेचं आहे.

त्यातून छोटे छोटे गृह उद्योग उभे राहू शकतात. डाळ प्रक्रिया उद्योगाला बँक पतपुरवठा करतात.

या उद्योगासाठी कमी भांडवल लागत असल्यामुळे दाल मील उद्योग ग्रामीण भागात सहज उभारता येतो.

तुरीपासून डाळ तयार करताना धान्यावर प्रक्रिया (Grain Processing) करून डाळ भरडून टरफले काढून नंतर डाळ वेगळी केली जाते.

जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची डाळ आणि कमीत कमी चुरी व पावडर मिळेल तेव्हा भरडाण्याची क्रिया उत्तम झाली आहे असे समजावे.

तुरीचं सहसा तीन प्रतीत उत्पादन होत. ग्रेड एक म्हणजेच फटका, ग्रेड दोन म्हणजेच समान नंबर आणि ग्रेड तीन म्हणजे साधारण अशा डाळींची किंमत ही बाजारात उतरत्या क्रमाने मिळते.

चुरी किंवा भुसा वाया जाण्यासारखे पदार्थ नाहीत. मूग व उडदाच्या मोगर निर्मितीतून तर सर्वात जास्त फायदा मिळतो.

सोयाबीन, हरभरा, मसूर, चवळी या कडधान्यापासूनही  डाळी बनविता येतात. 

Dal Mill Business idea
Tur Dal: तुरीची डाळ दुधापैक्षा जास्त पोष्टिक

डाळ मिल उभारण्यासाठी जागेची निवड व इतर बाबी 

डाळ मिल ची उभारणी अशा ठिकाणी करावी. ज्या ठिकाणी कच्चा व पक्का माल सहज व जवळ उपलब्ध होऊ शकेल.

काही शेतकरी दरवर्षी १० ते २० टनापर्यंत तूर, मूग व उडीद या कडधान्याचे उत्पादन घेतात. अशा शेतकऱ्यांना डाळ करून देता येऊ शकते. 

दोन चार मोठी गावे मिळून दालमिल उभारता येते. यासाठी ५० चौरस मीटरची एक खोली तसंच २०० चौरस मीटरची जागा सर्वसाधारणपणे मुख्य रस्त्यावर असावी.

धान्य चालविण्यासाठी एक तांत्रिक मजूर, ५ किलोवॅटचा विद्युत पुरवठा लागतो. कडधान्य किंवा डाळ वर्गीय धान्य भरडणे म्हणजे त्यांची टरफले काढणे आणि त्यांची डाळ तयार करणे.

काही कडधान्यांमध्ये त्यांची टरफले डाळीला अतीशय घट्ट चिकटलेली असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या डाळवर्गीय धान्यापासून टरफळे वेगळी करण आणि त्यांची डाळ तयार करण अतिशय अवघड असतं.

या अडचणीवर मात करण्यासाठी कडधान्य ओलविणे आणि वाळविण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळ टरफलाचा भाग डाळीपासून काही प्रमाणात सुटा होतो.

पारंपारिक पद्धतीन कडधान्य प्रक्रिया केल्यास डाळीच उत्पादन पद्धतीमध्ये डाळ तयार करताना घर्षण अधिक होतं त्यामुळ उर्जेचा खर्च वाढतो.

हे सर्व टाळण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण अधिक फायदेशीर ठरत. त्यामुळ डाळीच उत्पादन सुद्धा ८२ ते ८५ टक्के पर्यंत वाढविता येतं.

डाळीचा चुरा हा पशू खाद्य म्हणून वापरता येतो.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com