
गवती चहा ही वनस्पती सुगंधी आणि औषधी वनस्पती (Aromatic and Medicinal Plant) म्हणून ओळखली जाते. गवतीचहाच्या (Citronella) पानांपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो. तर अशा या अनेक अंगानी उपयुक्त असलेल्या गवती चाहाची लागवड वर्षभर करता येते. गवती चाहाच्या लागवडीविषयी औषधी व सुगंधी वनस्पती योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
गवती चहाच्या लागवडीसाठी मध्यम काळी पोयट्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ओडी ४४०, सीकेपी - २५, आरआरएल - १६, या जातींची निवड करावी. लागवड ७५ सेंमी बाय ७५ सेंमी अतरावर करावी. याप्रकारे लागवड केल्यास हेक्टरी २२ हजार ठोंब लागतात. लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी. त्यानंतर कापणी दर तीन महिन्यांनी करावी. पहिल्या दोन वर्षात हेक्टरी २० टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते. गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे चे प्रमाण ७५ टक्के असते. यामध्ये जीवनसत्व अ मोठ्या प्रमाणात असते. तेल रंगाने पिवळसर असून त्याला लिंबासारखा वास येतो.
गवती चहाचा उपयोग
गवतीचाहाचे तेल संधेदुखीवर उपयुक्त आहे.
कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.
पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे.
सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो.
साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.