कशी ओळखली जाते दुधातील भेसळ ?

आपला भारत देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला तरी देशातील जवळपास ६८ टक्के दूध अन्न सुरक्षा निकषांची पूर्तता करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या दुधात भेसळीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
milk adulteration
milk adulteration
Published on
Updated on

आपला भारत देश दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर असला तरी देशातील जवळपास ६८ टक्के दूध अन्न सुरक्षा निकषांची पूर्तता करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या दुधात भेसळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. दुधात पाणी टाकल्यानंतर दुधाची घनता वाढविण्यासाठी दुधात पीठ, साखर, मैदा यांसारख्या पदार्थांची भेसळ केली जाते. अशा भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यास हानिकारक असते.

  • खाण्याच्या सोड्याची भेसळ- परीक्षा नळीमध्ये ५ मिली दूध घेऊन त्यात ५ मिली अल्कोहोल टाकावे. या मिश्रणात ३ थेंब रोझोलिक आम्ल टाकावे. मिश्रणाचा रंग गुलाबी झाल्यास दुधात खाण्याच्या सोड्याची भेसळ आहे असे समजावे.
  • पिष्टमय पदार्थांची भेसळ- परीक्षा नळीमध्ये ५ मिली दूध घेऊन त्यात ३ थेंब आयोडीनचे टाकावे. मिश्रणाचा रंग निळा झाल्यास दुधात पिष्टमय पदार्थांची भेसळ आहे असे समजावे.
  • युरियाची भेसळ- परीक्षा नळीमध्ये ५ मिली दूध घेऊन त्यात २० मिली ग्रम सोया पावडर आणि २ थेंब ब्रोमोथायमोल ब्लू टाकून मिसळून घ्यावे. १० मिनिटानंतर मिश्रणाचा रंग निळा झाल्यास दुधात युरियाची भेसळ आहे असे समजावे.
  • हेही पाहा- अंड्यात भेसळ होऊ शकते का?

  • ग्लुकोजची भेसळ- परीक्षा नळीमध्ये ५ मिली दूध घेऊन त्यात बारपोड मिश्रण टाकून ही परीक्षानळी उकळत्या पाण्यात धरावी. तळाशी लाल रंगाचे कण दिसल्यास ते कण वेगळे करून त्यात फासमोलोडिक आम्ल टाकल्यानंतर निळा रंग आल्यास ग्लुकोजची भेसळ समजावी.
  • दूध भुकटी- ५ मिली दूध परीक्षानळीमध्ये घेऊन ते ३००० आर. पी. एमला सेंट्रीफ्युगल मशीनमध्ये फिरवून घ्यावे. तळाशी राहिलेला गळ तीव्र नायट्रिक अॅसिडमध्ये विरघळवून घ्यावा. त्यात ५ मिली शुद्ध पाणी आणि २.५ मिली अमोनिया द्रावण टाकावे. केसरी किंवा पिवळसर रंग आल्यास टेस्ट पॉझिटिव्ह आहे असे समाजवे.  
  • पाण्याची भेसळ- दुधाच्या गोठण बिंदुवरून दुधात केलेली पाण्याची भेसळ ओळखणे सोप्पे जाते.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com