Business Records Keeping : व्यवसायाचा हिशेब अन नोंदी महत्त्वाच्या...

Business Accounts : उद्योग केल्याने नुसता पैसा मिळत नाही तर जगाची ओळख होते. आपण प्रशिक्षित होतो. स्वावलंबन, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता रुजते. उद्योगामध्ये स्वत:चा हिशेब स्वतःच ठेवायचा तर सिंगल एन्ट्री पद्धतीचा वापर करावा.
Animal Record Keeping
Animal Record KeepingAgrowon
Published on
Updated on

कांचन परुळेकर
Business Accounts and Records Keeping : उद्योग केल्याने नुसता पैसा मिळत नाही तर जगाची ओळख होते. आपण प्रशिक्षित होतो. स्वावलंबन, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता रुजते. उद्योगामध्ये स्वत:चा हिशेब स्वतःच ठेवायचा तर सिंगल एन्ट्री पद्धतीचा वापर करावा. हिशोब ठेवणे म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व पैशाची नोंद. यातून उद्योगाचा ताळेबंद मांडता येतो.

जेथे पैशाचे व्यवहार चालतात तेथे हिशेब ठेवणे आवश्यक ठरते. उद्योग व्यवसायाचे खरे चित्र हिशेबाच्या नोंदीवरून स्पष्ट होत असते. आपल्या उद्योगाचा आरसा म्हणजे हिशोब.

हिशेब ठेवण्याची गरज ः
१.कर नियमांचे पालन करणेसाठी जमा, खर्च, नफा याच्या नोंदी आवश्यक.
२.आपल्या जवळील मालमत्तेची प्रत्यक्ष किंमत कळण्यासाठी.
३. चोरी रोखण्यासाठी.
४. किंमत ठरवण्यासाठी.
५. गुंतवणुकीतील वाढ/ कमी झालेला पैसा समजण्यासाठी.
६. येणे किती, देणे किती याची स्पष्ट जाणीव वेळोवेळी होण्यासाठी.
७. नफा किती कमावला हे समजण्यासाठी.
८. बँकला आवश्यक तेव्हा ताळेबंद हजर करता येतो.
९. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई हिशोब ठेवल्यामुळे विना तक्रार मिळवता येते.
१०.उद्योग विभाजन झाले तर त्याक्षणाची आर्थिक स्थिती हिशेबामुळे स्पष्ट होते.

Animal Record Keeping
Animal Record Keeping : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे महत्व काय?

हिशेब ठेवण्यासाठी दस्तावेज ः
हिशेब ठेवण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण स्वत:चा हिशेब स्वतःच ठेवायचा तर सिंगल एन्ट्री पद्धतीचा वापर करावा. हिशोब ठेवणे म्हणजे येणाऱ्या सर्व पैशाची नोंद (आवक) जाणाऱ्या सर्व पैशाची नोंद( जावक) व या दोन्हीचा ताळेबंद.
१. रोजकीर्द
२. खतावणी
३. पावती पुस्तक
४.व्हाऊचर्स
५. बँक पासबुक/ चेकबुक
६. परवाने / पॅन कार्ड
७. मालमत्ता रजिस्टर
८. स्टॉक रजिस्टर
९. आवक जावक रजिस्टर
या सर्वांवरून आपण हिशेब नोंदी करू शकतो. त्यावरून तेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद तयार करता येतो. हिशेबावरून तयार करण्यात आलेल्या पत्रकामुळे नफा वाढविण्यासाठी किंवा तोटा कमी करण्यासाठी, कशा प्रकारचे नियोजन करायचे हे ठरविता येते.

कायम लक्षात ठेवण्यासारख्या बाबी ः
१. एकदा व्यवसाय सुरु झाला की जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी उत्पादकांचे जाळे विणणे, वाढविणे, कामाला तंत्राची जोड देणे, मूल्यवर्धित वस्तू बनविणे व उद्योगासंबंधी एकदम नवीन प्रकारचे काम सुरु करणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
उदाहरणार्थ आपण फुलशेती हा उद्योग सुरु केला. फुले उत्पादित करून आपण बाजारात पाठवितो. फुलशेती करणारी, फुलमाला बनविणारी, फुलापासून गुलकंद बनविणारी अन या सर्वांचा व्यापार करणारी ही मंडळी एकत्र आली तर सर्वांच्याच उत्पन्नात वेगाने वाढ होते. मधमाशा पालन, अत्तर बनविणे असे एकदम नवे उद्योगही सुचतात.
२. कच्चा माल

उद्योगाचे चक्र गतिमान असायला हवे. तर नफ्याचे प्रमाण वाढते. कच्चा माल कमी दर्जाचा त्यामुळे खराब, साठवण नीट नाही, पक्का माल नीट बनला नाही, बाजारात नेण्यास विलंब, विक्री नीट नाही, नफा उधळून टाकणे हे अडथळे. त्यामुळे पैशाचे चक्र मंदावेल.

३. मूल्यवर्धित वस्तूला जास्त किंमत ः
उदाहरण १ः

बी-----अंकुरण----- रोपे----- झाड------ फुले----- माला------- बुके
उदाहरण २ः
दूध----- दही------ तूप------ पनीर------ खवा------- मिठाई.
४. बाजारात ग्राहक हा महत्त्वाचा घटक असतो. त्याच्याशी गोड बोलणे, उत्पादन विक्रीची स्वच्छ जागा, उत्तम मांडणी महत्त्वाची बाब आहे.
५. उत्तम काम, योग्य किंमत, बाजारपेठेतील नाव यामुळे धंद्याचे चक्र कधीही थांबत नाही. “सही काम, सही दाम, खूब नाम” हा मंत्र ध्यानी ठेवावा.
६. पेकिंगकडे लक्ष द्यावे..
७. बँक व्यवहार माहिती करून घ्यावी.
८. व्यक्तिगत उद्योग, गटाचा उद्योग, भागीदारी, सोसायटी, कंपनी यातील फरक, फायदे, तोटे जाणून घ्यावेत.
९. उद्योग केल्याने नुसता पैसा मिळत नाही तर जगाची ओळख होते. आपण प्रशिक्षित होतो. स्वावलंबन, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता रुजते.
१०. उद्योग वाढीसाठी उत्तम अंदाजपत्रक बनवून नियोजनास सुरवात करावी.. भान देऊन योजना आखाव्यात आणि योग्य कालावधीत पूर्ण कराव्यात.
---------------------------------------
संपर्क ः
०२३१- २५२५१२९, : swayamsiddha.parulekar@gmail.com
(लेखिका कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com