Animal Care : शेतकरी नियोजन : गोपालन

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अनेक शेतकरी शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. तांदूळवाडी (ता. राहुरी) येथील संतोष धसाळ यांनी दोन एकर शेती. त्यामुळे त्यांनी दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

शेतकरी ः संतोष धसाळ

गाव ः तांदूळवाडी ता. राहुरी, जि. नगर

एकूण गाई ः ५० (एचएफ)

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अनेक शेतकरी शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देतात. तांदूळवाडी (ता. राहुरी) येथील संतोष धसाळ (Santosh Dhasal) यांनी दोन एकर शेती. त्यामुळे त्यांनी दहावीपर्यंतच्या शिक्षणानंतर दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यानुसार आठ वर्षापूर्वी दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. अल्पभूधारक शेतकरी असून संतोष यांनी जिद्दीने दूध व्यवसाय टप्प्याने वाढवत आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. दुग्ध व्यवसायातील बारकावे समजण्यासाठी संतोष यांनी राज्यासह, गुजरात, पंजाब राज्यात जाऊन पशुपालकांकडून माहिती घेतली.

Animal Care
Animal Care : शेतकरी नियोजन गाय-म्हैस पालन

व्यवसायाचा श्रीगणेशा

संतोष यांनी २०१३ मध्ये एक दुभती एचएफ गाय ३६ हजार रुपयांना खरेदी केली. त्याच एका गाईने जणू व्यवसायाला बळकटी दिली. पुढे हाच व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पहिल्या गायीच्या दुधापासून मिळालेल्या नफ्यातून दुसरी दुभती गाय खरेदी केली. असे करत टप्प्याटप्प्याने गाईंची संख्या वाढवली. सध्या त्यांच्याकडे सुमारे ५० गायी आहेत. गायींसाठी दोन वर्षापूर्वी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला पहिल्या वर्षी १२ ते १५ लिटर दूध संकलित व्हायचे. आता प्रतिदिन साडेतीनशे ते ४०० लिटर दूध संकलन होते. संतोष यांचा नगर जिल्हा परिषदेकडून आदर्श गोपालक म्हणून गौरव करण्यात आला आहे.संतोष यांच्यासह वडील माधवराव, आई सुनीता व पत्नी रोहिणी यांचाही कामांत सहभाग असतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपापली कामांची जबाबदारी वाटून घेतली आहे.

Animal Care
Animal Care : गाई,म्हशींतील अनुवंशिक सुधारणा का महत्त्वाची?

व्यवस्थापन बाबी

गोठ्यातील कामांना पहाटे पाच वाजता सुरवात होते.

मुक्तसंचार गोठ्यामध्येच एका बाजूस दूध काढण्यासाठी जागा असून समोरील बाजूला चाऱ्याची गव्हाण आहे. तेथे सुरुवातीला गाई बांधून त्यांना खुराक दिला जातो. व नंतर चारा टाकला जातो.

साधारण ६ वाजेपर्यंत दूध काढण्याचे काम पूर्ण होते. दूध काढण्यासाठी सुरुवातीपासूनच मिल्किंग मशिनचा वापर केला जातो.

संतोष यांनी दूध व्यवसाय करताना स्वअनुभवातून अनेक प्रयोग यशस्वी केले. मजुरांकरवी नाही तर स्वतः व्यवस्थापन करत सर्व बाबीला अधिक प्राधान्य देतात.

गायींना सहजपणे चारा खाणे व गरजेनुसार वेळेत पाणी पिता यावे यासाठी ५ बाय १०० फूट आकाराच्या पाच गव्हाणी बांधल्या. त्यातील दोन गव्हाणी पाण्यासाठी तर ३ गव्हाणींचा चाऱ्यासाठी वापर होतो.

Animal Care
Animal Care : थंड वातावरणात जनावरांची कशी काळजी घ्याल? | ॲग्रोवन

खाद्य व्यवस्थापन

गाईंचे वजन आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक गाईला दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी ५ किलो सरकीपेंड, वालीस, कांडी पेंड व मका पीठ असा खुराक दिला जातो.

दररोज सकाळी मुरघास, ऊस, मकाची कुट्टी, वाळलेला चारा याप्रमाणे वीस किलो चारा दिला जातो. संध्याकाळी लसूण घास व इतर मिळून १० किलो चाऱ्याची कुट्टी दिली जाते.

जनावरांचे पचन चांगले होण्यासाठी खाण्याचा सोडा व मिठाचा गरजेनुसार वापर केला जातो.

आरोग्य व्यवस्थापन

कालवडीला चौथ्या महिन्यानंतर व सातव्या महिन्यात ब्रुसेल्लोसीसचे लसीकरण केले जाते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तयार होऊन त्या निरोगी राहतात.

दुभत्या गाई, वासरे व गाभण गाई यांच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

गाईंपासून चांगल्या प्रतीची वासरे तयार व्हावीत यासाठी दर्जेदार सिमेन्सचा वापर केला जातो. विविध सीमेन्सच्या वापरातून आतापर्यंत सुमारे १८ कालवडी तयार केल्या आहेत..

दर तीन महिन्याला गाई, कालवडीला जंतनाशकाचे औषध दिले जाते.

लाळ्या खुरकूतचे लसीकरण केल्यानंतर २१ दिवसांनी बूस्टर डोस देतात.

लहान वासरांसाठी

काल्फ बॉक्स

लहान वासरांना सुरुवातीचे काही दिवस कॉल्फ बॉक्समध्ये ठेवून व्यवस्थापन केले जाते.

लहान वासरे गोठ्यातील माती चाटतात. त्यामुळे वासरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. लहान वासरांनी माती चाटू नये यासाठी सुरुवातीचे १०० दिवस काल्फ बॉक्समध्ये ठेवले जाते. काल्फ बॉक्समध्ये ठेवल्यामुळे त्यांना माती चाटता येत नाही. माती पोटात न गेल्याने वासरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

काल्फ बॉक्समध्ये ठेवलेल्या वासरांना शंभर दिवस काल्फ स्टार्टर पेंड, पाणी आणि प्रति वासरू सकाळी अडीच लिटर व संध्याकाळी अडीच लिटर दूध दिले जाते.

संपर्क ः संतोष धसाळ, ८९९९००५१४८ , (शब्दांकन ः सूर्यकांत नेटके, नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com