Poultry Business : नोकरीत मन रमले नाही म्हणून सांगलीच्या युवतीने सुरु केला पोल्ट्री व्यवसाय

मन नोकरीत रमले नाही. त्यामुळे सुरुवातीला शैला पाटील यांचा टेक्स्टाईल व्यवसायाचा विचार होता. मात्र त्यासाठी दोन कोटी रु. भांडवलाची आवश्यकता होती अन् हाती केवळ चार लाख रुपये होते. उपलब्ध भांडवलामध्ये पोल्ट्री हा एक पर्याय पुढे आला.
Poultry Business
Poultry Business Agrowon
Published on
Updated on

शेतकरी : शैला तुषार शिंदे-पाटील

गाव :पळशी, जि. सांगली

चार शेड व १२ हजार पक्ष्यांचे पालन.

सांगली जिल्ह्यातील पळशी (ता. खानापूर) येथील शैला तुषार शिंदे-पाटील यांचे सर्व शिक्षण फायनान्स (Finance Education) विषयातील आहे. पुणे येथून एम.कॉम, एम.बी.ए. (फायनान्स) व ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन’ (Diploma In Taxation) या पदव्या घेतल्या.

पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली. मात्र त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्यामुळे सुरुवातीला त्यांचा टेक्स्टाईल व्यवसायाचा विचार होता. मात्र त्यासाठी दोन कोटी रु. भांडवलाची आवश्यकता होती अन् हाती केवळ चार लाख रुपये होते. उपलब्ध भांडवलामध्ये पोल्ट्री हा एक पर्याय पुढे आला. मात्र त्यांना पोल्ट्री व्यवसायातील (Poultry Business) कोणतेही ज्ञान वा अनुभव नव्हता.

विटा परिसरातील या व्यवसायातील अनुभवी व्यक्तींना भेटून ज्ञान मिळवले. या काळात डॉ. पोळ यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यातून त्यांनी २०१२ मध्ये ब्रॉयलर पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला.

या व्यवसायातील प्रत्येक बारकावे, प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा जाणून घेत त्यानुसार त्या सुधारणा करत गेल्या. १२ हजार ब्रॉयलर पक्षांच्या पोल्ट्रीचा फार्म मोठ्या दिमाखात उभा आहे.

या व्यवसायात एक-दोन बॅचेसचा नफा वा तोटा यानुसार गणित पाहता येत नाही. मात्र वर्षभर सातत्य ठेवल्यास नफा होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

Poultry Business
Broiler Poultry Business : सातत्य, चिकाटीतून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी

ब्रॉयलर पक्ष्यांचे संगोपन

शेडची लांबी : २५० बाय ३४ फूट अशी एक शेड

शेडची लांबी : २३० बाय ३० फूट असे एक शेड

शेडची लांबी : ५० बाय २० फूट असे दोन शेड

सध्या १२ हजार पक्षी शेडमध्ये आहेत.

असे केले जाते नियोजन

अ) शेड

* बॅच संपल्यानंतर शेडमधील खत बाहेर काढून शेड स्वच्छ केले जाते.

* रोगप्रतिबंधक उपाययोजना म्हणून निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर चुना आणि त्यामध्ये पाच ते दहा किलो मोठ्या मिठाचा वापर केला जातो.

* पिल्लांच्या खाद्याची भांडी स्वच्छ करून भांडी देखील निर्जंतुकीकरण केले.

* शेडमध्ये तुसाचा वापर केला जातो.

* शेडच्या चारही बाजूंनी दाणेदार कीटकनाशकाचा वापर केला जातो. त्याच्या उग्र वासामुळे साप, धामण हे शेडपासून दूर राहतात.

ब) पक्षी संख्या

* सर्वसाधारण पणे एक ते दीड महिन्याला एक बॅच पूर्ण होते.

* बदलत्या मार्केटनुसार पक्ष्यांची संख्या ठरवली जाते. त्यासाठी सण-समारंभ, वर्षातील मागणी असलेले दिवस यानुसार शेड्यूल तयार केले जाते.

Poultry Business
Poultry Manuers : कोंबडी खताचा वापर कसा करायचा?

क) प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर

* पक्ष्यांना कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अगोदरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण केले जाते.

* या पक्ष्यांचे लसीकरण वेळच्या वेळी करण्याकडे लक्ष दिले जाते.

* डोळ्यात ‘आयव्ही’ लस टाकली जाते.

* पाचव्या दिवशी ND आणि IBH लसीकरण केले जाते.

ड) शुद्ध आणि स्वच्छ पाणी महत्त्वाचे

* शेडवर पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून, उन्हाळ्यातही पाणी थंड राहावे, यासाठी टाक्यांना गोण्या बांधल्या जातात.

* उन्हाळ्यात भूजल पातळी कमी होते. त्यामुळे पाण्याचा पी. एच. तपासला जातो. त्यानंतर योग्य पी. एच. केल्यानंतर पाणी दिले जाते

* पाण्यामध्ये लिंबू आणि थोडेसे मीठ मिसळले जाते. अशा पाण्यामुळे पक्ष्यांना ऊर्जा मिळण्यास मदत होते.

* गरजेप्रमाणे पाणी पक्षांना दिले जाते. यामुळे मर कमी होण्याचा प्रमाण कमी राहते.

* पाईपमध्ये शेवाळ होऊन, त्याद्वारे विविध रोगाचा प्रादुर्भाव पक्ष्यांना होऊ शकतो. त्यामुळे दर काही काळानंतर सर्व पाइप स्वच्छ केले जातात.

* शेडमधील तापमानही कमी करण्यासाठी २२ फॅन लावले आहेत.

इ) खाद्यावरील खर्चात बचत

* ३००० पक्ष्यांसाठी वयानुसार दररोज १०० किलोपासून ते एक टनांपर्यंत खाद्याची गरज.

* पक्षांना खाद्य देण्यासाठी स्वतःची फीडमील असून, त्यामुळे खर्चात २० ते २५ टक्के बचत होते.

* कच्च्या मालाची शेतकरी आणि मार्केटमधून खरेदी केली जाते.

शैला तुषार शिंदे-पाटील, ८६६९५६७८२२, (शब्दांकन : अभिजित डाके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com