Umed Mall : ‘उमेद मॉल’साठी जिल्हा परिषदेची जागा वापरण्याचा विचार

Zilla Parishad Land : बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर उमेद मॉल सुरू करण्याचा विचार असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
Jaykumar Gore
Jaykumar GoreAgrowon
Published on
Updated on

Nashik News : बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर उमेद मॉल सुरू करण्याचा विचार असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

मंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २८) ग्रामविकास योजनांच्या अनुषंगाने नाशिक विभागाची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालय येथील नियोजन सभागृहात पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, अपर आयुक्त अजय मोरे, उपायुक्त उज्ज्वला बावके आदी या वेळी उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, की ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज असून त्याबाबत अधिकारी वर्गाने अधिक सकारात्मक पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Jaykumar Gore
Agriculture Technology: मळणी यंत्राच्या विविध यंत्रणा

सामान्य नागरिकांची कामे करण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश त्यांनी दिले. गोरे म्हणाले, की प्रत्येक सामान्य माणसाचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते.

ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी पंतप्रधान ग्रामीण घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण घरकुल योजनेतील अनुदान हप्ता लाभार्थ्यांना देण्याबरोबरच नरेगामधूनही केंद्राचा हप्ता लाभार्थ्यांना मिळेल, याचा पाठपुराव्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Jaykumar Gore
Agriculture Ai: कृत्रिम बुद्धिमत्ता : शेतीच्या अनेक समस्यांवरील आधुनिक उत्तर

पंतप्रधान ग्रामीण घरकुल टप्पा-१ व १ योजनेसह रमाई घरकुल योजना, ग्रामीण घरकुल योजना, मोदी घरकुल योजना, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, लखपती दीदी, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, ग्रामपंचायत विकास आराखडा, १५ वा वित्त आयोगातील खर्चाचा आढावा, ब-वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम आदींचा तपशीलवार आढावा मंत्री गोरे आणि राज्यमंत्री कदम यांनी घेतला.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह आशिष येरेकर (अहिल्यानगर), श्री. अंकित (जळगाव), सागरकुमार (नंदुरबार), विशाल नरवाडे (धुळे) हे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com