Labor Shortage
Labor Shortage Agrowon

Labor Wages: झुनका गावात ठरले मजुरी दर अन् तास

Wage Regulation : झुनका गावातील शेतकऱ्यांच्या या निर्णयाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते पाहून अनेक गावांतील शेतकरी आपल्या गावातही असा पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करत आहेत.
Published on

Wardha News : आर्थिक सक्षम शेतकऱ्यांकडून मजुरांना जादा मजुरी देऊन आपल्या शेतात नेण्याचे प्रकार घडतात. यात अल्पभूधारक आणि आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी मात्र भरडले जातात. यामुळे समुद्रपूर तालुक्यातील झुनका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत मजुरांचे कामाचे तास आणि मजुरी ठरविण्याचा निर्णय एकमताने घेतला. झुनका गावच्या शेतकऱ्यांच्या या निर्णयाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते पाहून अनेक गावांतील शेतकरी आपल्या गावातही असा पुढाकार घेण्याचे सांगत आहेत.

अशा निर्णयांना ग्रामपंचायतीने पाठबळ द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हा निर्णय गावच्या हिताचा असल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले. गावातील प्रमुख शेतकऱ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीला दिला. त्यानुसार यावर प्रतिक्रिया घेणे सुरू केले. ग्रामपंचायतीला तो अनुकूल वाटल्यास तसा ठराव घेण्याबाबतचा निर्णय सध्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

Labor Shortage
Labor Wages : ‘रोहयो’च्या १० हजार मजुरांची ३४ कोटींची मजुरी थकली

...असे असतील तास आणि दर

झुनका गावातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या प्रस्तावानुसार मजुरांचे कुठलेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. साधारणतः गावात सकाळी सात ते दुपारी १२ पर्यंत मजूर कामाला जातात. यात कामाचे पाच तास होतात, मात्र मजुरी तेवढीच आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी मजुरांना सकाळी १० ते सायंकाळी पाच असे आठ तास काम देण्याचा निर्णय घेतला.

शेतात फवारणीकरिता मजुरीचे दर ५०० रुपये राहतील. फवारणी सोडून इतर कामांकरिता मजुरी दर ४०० रुपये राहील, असा निर्णय झुनका येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या काळात कोणताही शेतकरी मजुरांना वाढवून मजुरी देणार नाही, असे त्यांच्याकडून ठरविण्यात आले आहे.

नियम मोडणाऱ्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये दंड

गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत घेतलेल्या या निर्णयाविरोधात एखाद्या शेतकऱ्याने काम केल्यास त्याला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने गावात काय बदल होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Labor Shortage
Labor Shortage : उन्हाचा चटका तीव्र, शेतीकामाला मजूर मिळेनात

...असा निर्णय घेणारे दुसरे गाव

मजुरांच्या कामाचे तास ठरविण्याचा निर्णय यापूर्वी पुणे जिल्ह्यातील धमणार ग्रामपंचायतीने २५ जून २०२५ रोजी घेतला होता. आता वर्धा जिल्ह्यातील झुनका ग्रामस्थांनी तसा निर्णय घेत ग्रामपंचायतीला ठराव घेण्याची मागणी केली आहे.

नियम मोडणाऱ्याला दंड

गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत घेतलेल्या या निर्णयाविरोधात एखाद्या शेतकऱ्याने काम केल्यास त्याला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने गावात काय बदल होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मजुरांना बंधन नाही

शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयात मजुरांना मजुरीबाबत कोणतेही बंधन नाही. त्यांना जादा मजुरी मिळाल्यास ते बाहेर गावच्या त्या कामाला जाऊ शकतात. त्यांना जाण्यास कोणीही अडवणार नाही, असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

गावात सध्या शेतीच्या कामाची लगबग आहे. अशात आर्थिक सक्षम शेतकऱ्यांकडून जादा मजुरी देत मजूर आपल्या शेतात नेण्याच्या घटना घडल्या. त्याचा विपरीत परिणाम अल्पभूधारक शेतकऱ्यांवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांच्या कामाचे तास आणि मजुरीचे दर ठरविले आहेत. तशी माहिती ग्रामपंचायतीला देण्यात आली. सध्या ग्रामपंचायतीकडून यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
- बालूभाऊ उरकुडे, सरपंच, झुनका, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com