Labor Shortage : उन्हाचा चटका तीव्र, शेतीकामाला मजूर मिळेनात

Onion Harvesting : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता अनेक भागांत कांदा काढणीला सुरुवात झाली आहे.
Onion Harvesting
Onion Harvesting Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : सध्या बहुतांश भागात कांदा, उन्हाळी बाजरीच्या काढणीसह इतर शेतीकामे सुरू आहेत. मात्र सध्या उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. त्यामुळे मजूर शेतात काम करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतीकामाला मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मजुरांचा प्रश्न उभा आहे. मजूर मिळत नसल्याने काही भागांत अधिक मजुरी देऊन मजूर बोलवावे लागत आहेत. मार्चच्या सुरुवातीच्या तुलनेत सध्या तीस टक्के मजुरांना अधिक दर द्यावा लागत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता अनेक भागांत कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. याशिवाय उन्हाळी बाजरी, मागास पेर झालेल्या गव्हाची सोंगणी, मक्याची काढणी, मुरघास तयार करणे, कलिंगड, खरबुजाची तोडणी आदींसह इतर शेतीकामे सुरू आहेत. मात्र उन्हाची तीव्रताही अधिक आहे.

Onion Harvesting
Onion Harvesting : खानदेशात कांदा, मका, गव्हाची कापणी वेगात

त्यामुळे उन्हात मजूर काम करण्याला धजावत नसल्याचे दिसत आहे. त्यातच गावोगाव ग्रामदैवत यात्रोत्सव सुरू असल्याने मजूर काम सोडून यात्रांमध्ये सहभागी होत आहेत. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मजुरीचे दर वाढवून द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिकाचा उत्पादन व खर्च याचा मेळ घालत असताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत असल्याचे दिसते.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आठ हजार रुपये प्रति एकरी असलेली कांदाची काढण्याची मजुरी एकरी १२ ते १३ हजार झाली आहे, तर गहू एकरी काढून मळणी करून देण्याची मजुरी अडीच पोते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि मजुरी यातच पिकाचे उत्पन्न खर्च होत असल्याने पदरात मात्र काहीही रहात नसल्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जनावरांना चारा नसल्याने चाऱ्याचे भाव वाढले आहेत.

Onion Harvesting
Onion Harvest Labour Shortage: कांदा काढणीत मजूरटंचाईची झळ

गव्हाचा एकरी भुश्‍श्‍याचा ५ हजार रुपये झाला असून, मका, घास आणि ज्वारीचे कडवळ चढ्या भावाने विकले जात आहे. त्याचबरोबर उसाचा चारा प्रति टन वाढ्यासहीत ३ हजार ते ३२०० रुपये दराने विकला जात असल्याने पशुपालक शेतकरी संकटात आहे. मजूर मिळवताना अधिकचा दर देऊन पुन्हा त्यांच्या जाण्या-येण्याची, पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्याने अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

उन्हाचा वाढलेला पारा, घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होत असल्याने मजूर मिळत नाहीत. कार्यक्षम असलेले मजूर मजुरी वाढवून मागत आहेत. त्यामुळे बाहेर गावावरून मजूर आणण्यासाठी अधिकचा खर्च येत आहे. जवळ उपलब्ध असलेल्या मजुरांनाही मजुरी वाढवून द्यावी लागत आहे.
- शिवाजी जाधव, प्रगतिशील शेतकरी, भावीनिमगाव, ता. शेवगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com