Zero Light Bill : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख ६७ हजार शेतकऱ्यांना शून्य वीजबिल

Electricity : बळीराजा मोफत वीज योजना; वीजबिलांपोटी शून्य रकमेच्या पावत्यांचे वितरण
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या सभेने घातला सरकारचा चौदावा एप्रिल ते जून २०२४ च्या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ३११ कोटी २४ लाख रुपयांची रक्कम महावितरणला प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना वीजबिल प्राप्तीच्या पावत्या म्हणजेच शून्य वीजबिलांचे वितरण महावितरणकडून करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार एप्रिल २०२४ पासून राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील ३ लाख ६७ हजार ६७४ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

राज्यात महावितरणचे राज्यात ४७ लाख ४१ हजार कृषिपंपधारक वीजग्राहक आहेत. या कृषिपंपांकडून ३९ हजार २४६ दशलक्ष युनिट वार्षिक वीजवापर होतो. शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे व अनियमित पर्जन्यमानामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली. त्याची अंमलबजावणी महावितरणकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या ७.५ अश्‍वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याचा व त्यासाठी १४ हजार ७६० कोटी रुपये अनुदान महावितरणला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.

Electricity
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्रज्ञानाने होणार दहा हजार एकरांवर शेती

त्यानुसार एप्रिल ते जून २०२४ या कालावधीकरिता राज्यातील ४४ लाख ३२ हजार ३९७ शेतकऱ्यांच्या बिलापोटी २७५० कोटी रुपये राज्य शासनाने महावितरणला अदा केले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शून्य वीजबिलांच्या पावतीचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेप्रातिनिधिक रूपात झाले.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा धनादेश स्वीकारला होता. यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला उपस्थित होत्या. एप्रिल ते जून २०२४ या त्रैमासिक वीजबिलांपोटी राज्य शासनाकडून ३११ कोटी २४ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना वीजबिलाची रक्कम प्राप्त झाल्याची पावती वितरित करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com