YCM Open University : मुक्त विद्यापीठ देणार युवकांना कौशल्य प्रशिक्षण

Skill Training For Youth : मुंबई येथे मंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठकीत वाढवण बंदर निर्मिती, खर्च, अपेक्षित आयात-निर्यात, होणारी आर्थिक उलाढाल,लागणारे कुशल अकुशल मनुष्यबळ, रोजगार-व्यवसाय निर्मितीच्या संधीविषयी चर्चा झाली.
Skill Development
Skill DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथॉरिटी आणि नरिमन पॉइंट येथील वाढवण बंदर प्रकल्प मर्यादित (व्होपीपीएल) यांच्यासोबत महत्वाकांक्षी त्रिपक्षीय शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. शिक्षणातून रोजगार निर्मितीसंदर्भात हा करार ठोस पाऊल ठरणार आहे. या माध्यमातून सुमारे एक लाख युवक-युवतींना मुक्त विद्यापीठामार्फत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबई येथे करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानुसार वाढवण बंदर निर्मितीच्या पार्श्वभूमीवर व तेथील गरज आणि मागणीनुसार राज्यातील सुमारे एक लाख युवक, युवतीना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे व्यवसाय व रोजगाराभिमुख कौशल्य आधारित शिक्षण-प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Skill Development
Agriculture Skill Labor : शेतीत स्वयंरोजगारासाठी कुशल मनुष्यबळ हवे ः डॉ. मणी

कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या पुढाकाराने करार अमलात आला. मुंबई येथे मंत्री शंतनू ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठकीत वाढवण बंदर निर्मिती, खर्च, अपेक्षित आयात-निर्यात, होणारी आर्थिक उलाढाल,लागणारे कुशल अकुशल मनुष्यबळ, रोजगार-व्यवसाय निर्मितीच्या संधीविषयी चर्चा झाली.

तेथे लागणारे जवळपास एक लाख कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी आधी त्यांना कौशल्याधारित शिक्षण, प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. त्यासाठी मुक्त विद्यापीठाची निवड केली आहे. कुलसचिव दिलीप भरड, निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम, जवाहरलाल नेहरू पोर्ट अॅथॉरिटी व वाढवण प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांनी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. जिल्हाधिकारी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Skill Development
Farming Skill School : शेती, पूरक व्यवसाय कौशल्याचे धडे देणारी शाळा

१९ विविध कौशल्याधारित प्रशिक्षण

जेएनपीए आणि वाढवण प्रकल्पाने १९ विविध कौशल्य आधारित शिक्षणक्रमांची यादी मुक्त विद्यापीठाकडे सादर केली आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून त्यात्या क्षेत्रातील व विषयातील तज्ज्ञ व्यक्तींकडून संबंधित शिक्षणक्रम तयार केले जातील. इच्छुक विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे शिक्षण, प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी विविध अभ्यासकेंद्र सुरु केले जाणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील युवक-युवतींना प्रशिक्षण घेऊन रोजगारसंधी उपलब्ध होणार आहे.

जहाजबांधणी, बंदर निर्मिती,अन्न व खाद्य पदार्थ प्रक्रिया,शेतीमाल प्रक्रिया, लँडस्केपिंग आणि बागकाम, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल मेंटेनन्स,फॅब्रिकेशन सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल, पॅकेजिंग, लॉजिस्टिक सपोर्ट, मालवाहतूक व इतर उद्योग आदी संदर्भातील विविध प्रकारचे कौशल्य आधारित शिक्षणक्रम विद्यापीठातर्फे सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुक युवक युवतींना संबंधित विषयाचे शिक्षण प्रशिक्षण प्राप्त होऊन वाढवन बंदर निर्मितीसाठी व तद्‍नंतर परिचलनासाठी मनुष्यबळ निर्मितीसाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.
डॉ. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com