Agriculture Skill Labor : शेतीत स्वयंरोजगारासाठी कुशल मनुष्यबळ हवे ः डॉ. मणी

Skill Manpower Agriculture : शेती व्यवसायात कुशल मनुष्यबळ निर्मिती होणे गरजेचे असून स्वयंरोजगारासाठी शेतकरी, युवकांमध्ये कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.
Dr. Indra Mani
Dr. Indra ManiAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : शेती व्यवसायात कुशल मनुष्यबळ निर्मिती होणे गरजेचे असून स्वयंरोजगारासाठी शेतकरी, युवकांमध्ये कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील सी. एन. एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड) यांच्या सामाजिक एकीत्वाच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण युवकांसाठी सुधारित शेती औजारांचा योग्य वापर, निगा व देखभाल या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण बुधवार (ता. १८) ते शुक्रवार (ता. २०) दरम्यान घेण्यात आले.

Dr. Indra Mani
Agriculture Labor Shortage : तळोदा भागातील शेतकरी मजूरटंचाईने त्रस्त

उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, पशु संवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनेच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, डॉ. स्मिता खोडके, डॉ. सुभाष विखे, डॉ. रवी शिंदे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. गोपाल शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. मधुकर मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.

Dr. Indra Mani
Agricultural Labor Problem : शेतमजूर शेती क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की कृषी औजारांची व यंत्राची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्यांचे आयुष्यमान कमी होऊन इंधन खर्चातही वाढ होते. नुकसान टाळण्यासाठी सुधारित शेती औजारांची योग्यरीत्या निगा व देखभाल करणे गरजेचे आहे.

शेतकरी प्रतिनिधी ज्ञानोबा पारधे, भारत आव्हाड, शीतल कच्छवे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणात पऱ्हाटी भुकटी यंत्र, खत पसरणी यंत्र, ड्रोनद्वारे फवारणी, सौर फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील ५५ शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com