Vashishthi River : जल दिनाच्या निमित्ताने वाशिष्ठी नदीचे पूजन

Water Day : वाशिष्ठी नदीचा उगमापासून ते संगमापर्यतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे.
Vashishthi River
Vashishthi RiverAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : वाशिष्ठी नदीचा उगमापासून ते संगमापर्यतचा प्रवास जैवविविधतेने नटलेला आहे. या प्रदेशाचे संवर्धन करण्यासोबतच जलपर्यटन, जलमार्गाने वाहतुकीला चालना मिळणे आवश्यक आहे. याउपक्रमातून नदीच्या तिरांवरील गावे आर्थिकदृष्टया समृध्द होणार आहेत.

या उपक्रमाला चालना देण्यासाठी परचुरीमधील ग्रामस्थांनी वाशिष्ठी नदीला साडी नेसविण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमासाठी गुहागर तालुक्यातील ग्रामस्थांसह कराड, नाशिक, पुणे येथील तीस पर्यटकही उपस्थित होते.

Vashishthi River
World Water Day : जागतिक जल दिन फक्त औपचारिक नको!

मध्यप्रदेशामध्ये नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनाऱ्यावरुन दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवली जाते. ठिकठिकाणी नर्मदेच्या तीरावर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. असाच प्रयोग यंदा गुहागर तालुक्यातील परचुरी गावशिवारात करण्यात आला. या परिसरात वाशिष्ठी नदीचे पात्र २९० मीटर रुंद आहे.

एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत साडी नेसवण्यासाठी ६५ साड्या लागल्या. या साड्या एकमेकांना गाठवून लांब पट्टा तयार करण्यात आला होता. एका किनाऱ्यावरुन हा पट्टा एका बोटीद्वारे सोडवत दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नेण्यात आला. नदीच्या मध्यभागी काही क्षण थांबून खणानारळाने नदीची ओटी भरण्यात आली. या निमित्ताने १८ मार्च ते २१ मार्च असे चार दिवस हाऊस बोटीत भागवत पुराण आणि मत्स्यपुराणाचे पारायण करण्यात आले.

Vashishthi River
World Water Day 2024 : वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीला प्रोत्साहन द्यायला हवे : प्रा. रमेश चंद

या उपक्रमाचे आयोजन परचुरीमध्ये पर्यटन सत्यवान देर्देकर, डॉ. समीधा देर्देकर, समर्थ देर्देकर यांनी केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना धीरज वाटेकर म्हणाले की, वाशिष्ठी नदीच्या खोऱ्याचा पर्यावरणपुरक, पर्यटनाला अनुकूल विकास तसेच नदीला प्रदूषणमुक्त बनविण्यासाठी नदीसोबतचे नाते घट्ट करण्याची गरज आहे.

जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सकाळी ग्रामस्थांच्या हस्ते वाशिष्ठी नदीचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्यासाठी योगदान देण्याची शपथ घेतली. त्यानंतर वाशिष्ठी नदीला नेसवलेल्या साड्या कार्यक्रमानंतर प्रसाद म्हणून उपस्थित महिलांना देण्यात आल्या. ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी या उपक्रमाला सहकार्य केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com