AI in Agriculture: ऊसशेतीत ‘एआय’ वापराबाबत शनिवारी बारामतीत कार्यशाळा

Organizing a Workshop: ऊस उत्पादनातील खर्च कमी करत उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बारामती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डसह विविध संस्थांच्या मदतीने ऊसशेतीत नवतंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यावर भर देण्यात येणार आहे.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

Baramati News: उसाची उत्पादकता वाढवण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करुन अधिक उत्पन्न व उत्पादन मिळविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रभावी वापर कसा करता येतो याचे प्रात्यक्षिक पाहण्यासह सविस्तर माहिती देण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा भरघोस ऊस उत्पादनाची किमया व साखर उद्योगाचे आधुनिकीकरणासाठी वापर’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळी दहा वाजल्यापासून बारामती नजीक सकाळी दहा ते साडेअकरा पर्यंत कृषी विज्ञान केंद्र येथे प्रात्यक्षिक पाहणी व त्यानंतर शारदानगर शैक्षणिक संकुलातील मंथन सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे.ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त तथा ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन राज्यातील सर्व प्रमुख सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : उसासाठी कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन हवे

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार असून या प्रसंगी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, प्रतापराव पवार, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित असतील. दरवर्षी हवामान बदलाचा मोठा फटका ऊसपिकास बसतो. उत्पादन घटण्यासोबतच ऊस उत्पादकांनाही त्याचा मोठा तोटा सहन करावा लागतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन एकरी खर्च कमी करुन उत्पादन वाढविण्यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड या जागतिक संस्थांच्या मदतीने काही प्रयोग केले आहेत. त्याचे यश लक्षणीय असल्याने आता राज्यातील सर्वच साखर कारखान्यांकडून अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा, असा ट्रस्टचा प्रयत्न आहे.

‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासह जागतिक स्तरावरील उद्योजक इलॉन मस्क यांनीही या संशोधनाची दखल घेतली आहे. कृषी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडविण्याची सुरुवात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने सुरू झाली असून त्याचा लाभ राज्यभरातील सहकारी व खासगी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच ऊस उत्पादकांना व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Sugarcane Farming
Agriculture AI technology : एआय ऊस शेतीत क्रांती करेल ः हर्षवर्धन पाटील

राज्य शासनही आग्रही...

नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी दोन वर्षांत पाचशे कोटी रुपये अनुदान राज्य सरकार देणार असल्याची घोषणा करत हा प्रकल्प शासनस्तरावरही तितकाच महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले आहे.

कारखानदारांनाही नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणार...

कृत्रिम बुद्धिमत्तेसोबतच या कार्यशाळेत कारखानदारीसाठी राख विलगीकरण, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, स्फुरदयुक्त सेंद्रीय खत निर्मिती, पाचटापासून बायोचार, वीजनिर्मिती करणारे छोटे यंत्र, इंधनबचत व जलशीतकरण, स्पेंटवॉशवर प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान, कौटुंबिक बायोगॅस संयंत्र, गांडूळखत प्रकल्प तयार करणे, इथेनॉल, अल्कोहोल तयार करण्याची नावीन्यपूर्ण पद्धती व पुरवठा साखळी व्यवस्थापन या बाबत अमेरिका आर्यलँड, इंग्लंड व दुबई येथील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com