Nashik Sugar Factory : ऊस उत्पादकांच्या हितासाठी ‘वसाका’ भाडेतत्त्वावरच

Sugar Mill : या कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढवून को-जनरेशन ही सुरू करावे.कारखाना पुन्हा सुरू झाल्यास शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgorwon
Published on
Updated on

Nashik News : येथील वसाका साखर कारखान्याची विक्री न होऊ देता कामगार व ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन आगामी काळात सदर कारखाना भाडे करारानेच चालविण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी (ता. ४) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकित घेण्यात आला, अशी माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड या तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, अशी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. गेल्या दहा वर्षांपासून कारखाना बंद आहे.

Sugar Factory
Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्याचा मोठा निर्णय; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर १०० रुपये पहिला हप्ता अदा

कामगार व सभासदांच्या हितासाठी कारखाना पुन्हा सुरू करावा या संदर्भात चर्चा करण्यासाठी चांदवडचे आमदार राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखालील वसाका कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, शिखर बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की या कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढवून को-जनरेशन ही सुरू करावे.कारखाना पुन्हा सुरू झाल्यास शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना म्हणून तो पुढे चालवण्यासाठी सांघिक प्रयत्न व्हावेत.

Sugar Factory
Rajaram Sugar Factory : राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेपूर्वीच विरोधक आक्रमक, 'सभासदांना अपेक्षित सहकार्य नाही'

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा करणाऱ्या विकास सेवा संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. हा कारखाना पुन्हा सुरू झाल्यास शेतकऱ्यांसह कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. हा शेतकऱ्यांचा कारखाना म्हणून पुढे चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा.

बैठकीस आमदार राहुल आहेर, शिखर बँकेचे अधिकारी विद्याधर अनासकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुकाध्यक्ष पंडित निकम, वसाका कामगार युनियन यांचे विलास देवरे, सुनील देवरे, हिरामण बिरारी, विलास सोनवणे, आनंदा देवरे, रवींद्र सावरकर, नंदू माधव, सतीश शिरोडे, नाना देवरे, आदींसह सहकार व वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कसमादे परिसरातील २८ हजार सभासदांच्या मालकीचा व ७०० कामगारांची रोजीरोटी असलेला वसाका राजकारणाचा बळी ठरला आहे. बंद पडलेली कारखान्याची चाके पूर्ववत सुरू होऊन वसाकाचे गतवैभव प्राप्त व्हावे अशी सभासद व कामगारांची इच्छा आहे. राज्यातील महायुतीचे शासन सकारात्मक विचार करते हा आशेचा आहे.
- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com