Sugarcane Workers Precautions : मजुरांनी ऊस तोडणी करताना बिबट प्रवण क्षेत्रात काळजी घेण्याचे आवाहन

Maharashtra Forest Department : अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा वावर आहे. आता साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असून, ऊसतोडणी करताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.
Maharashtra Forest Department
Maharashtra Forest DepartmentAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा वावर आहे. आता साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असून, ऊसतोडणी करताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांनी सांगितले, की साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झालेले आहेत. त्यामुळे ऊसतोडणीला सुरुवात होत आहे. बहुतांश भागात बिबट्याचा वावर सुरू आहे. बिबटे आढळून येत असल्याने ऊसतोडणी सुरू असताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

Maharashtra Forest Department
Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांचा डेटा बेस तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांची साखर कारखान्यांना सूचना

अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते. मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. खूप वाकून ऊसतोड करू नये. अशा वेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो.

Maharashtra Forest Department
Sugarcane Surveying : ऊस सर्व्हेक्षणासाठी आता ‘एआय’ची मदत घेणार

ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्ल्यू टूथ स्पीकरचा वापर करून मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवावीत, यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते. ऊसतोडणी किंवा शेतीची कामे करत असताना समूहाने कामे करावीत. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत.

गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये, त्यांना दगड मारून पळवण्याचा प्रयत्न अथवा मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. बिबट तसेच बिबट्याची पिले आढळल्यास तत्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी याच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com