Irrigation Project : ‘वाकुर्डे’च्या दुसऱ्या टप्प्यातील काम गतीने

Water Irrigation Project : शिराळा-वाळवा तालुक्यांसाठी वरदायी ठरणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनची कामे गतीने सुरू आहेत.
Irrigation Project
Irrigation ProjectAgrowon

Sangli News : शिराळा-वाळवा तालुक्यांसाठी वरदायी ठरणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनची कामे गतीने सुरू आहेत. शिराळा तालुक्यातील ८ गावांतील ७५५ हेक्टर, तर वाळवा तालुक्यातील ५० गावांतील १५ हजार ५ हेक्टर क्षेत्र लवकरच ओलिताखाली येणार आहे.

१९९५-९६ ला युती शासनाच्या काळात या वाकुर्डे बुद्रुक योजनेला मंजुरी मिळाली. युती शासनाकडून शिराळा-वाळवा तालुक्याला बरदान ठरणारी वाकुर्डे योजना मंजूर करून घेतली. यामध्ये टप्पा क्रमांक एक व दोन असे भाग पाडण्यात आले. टप्पा क्रमांक एकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Irrigation Project
Irrigation Projects : दर पंचवार्षिकला तापतो अपूर्ण प्रकल्पांचा मुद्दा

टप्पा क्रमांक दोनची कामेही गतीने सुरू झाली आहेत. लादेवाडी गावाजवळ वारणा डाव्या कालव्याच्या ६७ किलोमीटरवरून पाणीउपसा होणार आहे. या पंपहाऊसमध्ये २ हजार अश्वशक्तीचे ४ पंप बसविण्यात येणार आहेत. १ हजार ५१० एमएमच्या दोन उर्ध्वगामी नलिकेतून सुमारे १ हजार ७४० मीटर लांबून डोंगरवाडी येथील वितरण हौदात पाणी सोडण्यात येणार आहे.

वितरण हौदातून शिराळा तालुक्यातील क्षेत्राला १ व वाळवा तालुक्यातील क्षेत्राला २ बंदिस्त नलिकेद्वारे पाणी देण्यात येणार आहे. लादेवाडी ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत मुख्य गुरुत्व व मुख्य एक्स्प्रेस या दोन बंदिस्त नलिका टाकण्यात येणार आहेत. मुख्य गुरुत्व नलिकेतून लादेवाडी ते इटकरेपर्यंतचे ३ हजार १२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यापुढे कासेगावपर्यंत ४ हजार ६७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

Irrigation Project
Irrigation Project : पाडळसेसह अनेक सिंचन प्रकल्पाचे भिजत घोंगडे

असे ३३ गावांतील एकूण ७ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वाकुर्डे भाग-२ या कामांची कालमर्यादा चार वर्षांची आहे. यामध्ये पंपहाऊस, उर्ध्वगामी नलिका, वितरण हौद व राष्ट्रीय महामार्गापर्यंतचे काम दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. लादेवाडी ते इटकरेपर्यंत बंद नलिकेची लांबी १२ किलोमीटर असून ४८ किलोमीटरची वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे.

वाळव्यातील गावनिहाय ओलिताखाली येणारे क्षेत्र (हेक्टर) ः

ठाणापुडे ७०.०२, डोंगरवाडी ३०३.१८, चिकुर्डे १२०.०२, करंजवडे २२८.१२, शेखरवाडी १४०.०८, कार्वे १२७.३७, ढगेवाडी ४६.४३, ऐतवडे बुद्रुक ५५३.१२, ऐतवडे खुर्द ८.५२, जक्राईवाडी १५.०९, लाडेगाव १२६.४९, वशी २८९.८४, कुरळप २८८.६५, येलूर ६७१.५१, इटकरे ३९२.०३, नेर्ले ३१९.९१, काळमवाडी ५३८.७६, शेणे २३९.४६, भाटवाडी १५८.५७, केदारवाडी २५.७३, वाटेगाव ५२६.४३, कासेगाव ६९२.३६, येडेनिपाणी ७१९.००, मालेवाडी ३५४.११, तांदूळवाडी १००.४७, बहादूरवाडी १३३.४४., भडकंबे २०७.०७, नागाव १९१.२३, पोखर्णी २०४.६७, फाळकेवाडी २३०.३३, काकाचीवाडी १३९.६३, आष्टा ७९२.५६, कामेरी १३६०.६२, गाताडवाडी २५९.५१, तुजारपूर २९४.७५, उरूण ४०८.०९, इस्लामपूर १८६.५०, वाघवाडी २१५.१२, पेठ ३३३.५७, जांभूळवाडी १९६.९०, रेठरेधरण ४३७.६१, ओझर्ड १४५.६८, घबकवाडी ३५.५२, नायकलवाडी १५२.३५, महादेववाडी २१३.३३, माणिकवाडी २२१.९१, गोटखिंडी ८२७.३७, बावची ७००.९४, रोजावाडी ५९.२१, बागणी १.८१ असे एकूण १५ हजार ५ हेक्टर.

शिराळ्यातील गावनिहाय ओलिताखाली येणारे क्षेत्र (हेक्टर)

इंगुळ १७१.१२, जांभळेवाडी ११०.९१, कापरी १६७.४९, लादेवाडी २१४.०८, मांगले १५.८१, फकीरवाडी ४९.४१ रेड ८.८०, शिराळा १७.३८, असे एकूण ७५५ हेक्टर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com