Irrigation Project : निधीअभावी रखडले दहा सिंचन प्रकल्पांचे काम

Irrigation Update : सालेकसा तालुक्‍यातील दहा लघू सिंचन प्रकल्पांवर १६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र त्यानंतर निधीची तरतूदच करण्यात आली नाही.
Irrigation Project
Irrigation ProjectAgrowon
Published on
Updated on

Gondiya News : सालेकसा तालुक्‍यातील दहा लघू सिंचन प्रकल्पांवर १६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र त्यानंतर निधीची तरतूदच करण्यात आली नाही. परिणामी, यापूर्वी खर्च निधी पाण्यात गेल्याचा आरोप होत आहे. सोबतच शेकडो हेक्‍टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे.

सालेकसा तालुक्‍यातील दहा लघू सिंचन प्रकल्पांकरिता १५ वर्षांपूर्वी ६०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. त्यातील १६२ कोटी रुपये सर्व प्रकल्पाच्या कामांवर वापरण्यात आले. लघू पाटबंधारे तलाव कहाली हा प्रकल्प ३२ लाख ९० हजार रुपये एवढ्या सुधारित किमतीचा आहे.

Irrigation Project
Irrigation Department : पोटवितरिका फोडून पाणी सोडल्याप्रकरणी पवारांवर गुन्हा

त्याकरिता केवळ ३० टक्‍के रक्‍कम खर्च करण्यात आली. प्रकल्पाची घळभरणी व कालव्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. आतापर्यंत १० लाख ४५ हजार रुपयांचा निधी या प्रकल्पावर खर्च झाला आहे. लघू पाटबंधारे तलाव दंडारी हा प्रकल्प ४५ लाख १५ हजार रुपये इतक्‍या सुधारित किमतीचा असून यावर आतार्पंत १४ लाख ९० हजार रुपये खर्च करण्यात आले.

या ठिकाणीसुद्धा घळभरणी व कालव्याचे काम शिल्लक आहे. काही त्रुटींमुळे हा प्रकल्प रखडला. लघू पाटबंधारे तलाव मरामजोब हा प्रकल्प ३४ लाख ५९ हजार रुपये किमतीचा आहे. या प्रकल्पावर जवळपास २४ लाख रुपये खर्च झाले या ठिकाणी सुद्धा कालव्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. लघू पाटबंधारे तलाव कारुटोला हा प्रकल्प २५ लाख रुपयांचा असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकूण २६ हेक्‍टर शेतीला याचा लाभ होणार होता.

Irrigation Project
Agriculture Irrigation : विंधन विहिरीसाठी ९५० प्रस्ताव दाखल

या प्रकल्पाला रोजगार हमी योजनेतून वगळण्यात आले आहे. लघू पाटबंधारे तलाव मक्‍काटोला हा प्रकल्प४८ लाख ७८ हजार रुपयांचा आहे. या प्रकल्पावर २५ लाख ४५ हजार रुपये खर्च झाला. प्रकल्प पूर्ण झाल्यास ४४ हेक्‍टर जमिनीला सिंचनाची सोय होणार होती. परंतु प्रकल्पाचे कामही रखडले आहे.

वन कायद्यात अडकला प्रकल्प

लघू पाटबंधारे तलाव जांभळीची किंमत ७ लाख ५ हजार रुपये आहे. हा प्रकल्प सुद्धा वनजमीन कायद्याअंतर्गंत अडकून पडला आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ३ लाख ३९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. या माध्यमातून ११ हेक्‍टर जमिनीला सिंचनाची सोय होणार होती. परंतु हा प्रकल्पही लालफितशाही अडकल्याने हिरवे स्वप्न भंगले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com