Kadwa Project : ‘कडवा’ चे पूरपाणी तातडीने कालव्यास सोडावे’; माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची मागणी

Flood water : कडवाच्या लाभक्षेत्रात पर्जन्यमान कमी असल्याने कालव्याला पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे.
 Kukadi Project
Kukadi ProjectAgrowon

Nashik News : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागाच्या जिव्हाळ्याच्या अशा कडवा प्रकल्पाचे पूरपाणी तातडीने कडवा कालव्यास सोडावे, अशी मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी दिले.

कडवा धरणाच्या लाभक्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. सद्यःस्थितीत कडवा धरणाचा पाणीसाठा सुमारे ८० टक्क्यांच्या आसपास असून धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. सिन्नरच्या लाभक्षेत्रात व विशेषतः पूर्व भागात पाऊस अतिशय कमी झाला आहे. या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच पशुधनाची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.

१४ गाव पाणी पुरवठा योजनेसह लाभक्षेत्रातील बंधारे व तलावांत कडवा कालव्याद्वारे पूरपाणी तातडीने सोडल्यास लाभक्षेत्रात नागरिकांच्या व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होणार आहे, असे श्री. वाजे यांनी पत्रात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com