Processing Industry : महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करावेत: दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महिला व युवतींनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करावेत.
Food Processing Industry
Food Processing Industry Agrowon

Pune News : ‘‘आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महिला व युवतींनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करावेत. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून बँकांचे अर्थसाहाय्य, शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण, पॅकिंग, मार्केटिंग आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

याबाबत अद्ययावत प्रशिक्षण व उत्पादित मालाचे ब्रॅंडिंग होण्यासाठी अनसूया महिला उन्नती केंद्राने व पूर्वा वळसे पाटील यांनी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शिवगिरी मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त अनसूया केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते.

Food Processing Industry
Jackfruit Food Processing : फणसाचे मूल्यवर्धित पदार्थ

या वेळी अनसूया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, सुषमा शिंदे, सविता बगाटे, उषा कानडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक बाबासाहेब खालकर यांच्यासह अनेक गावच्या महिला सरपंच व बचत गटाचे अध्यक्ष उपस्थित होते.

Food Processing Industry
Jaggery Food Processing : फ्रूटपल्प, चॉकलेटरूपी नावीन्यपूर्ण गूळ

वळसे पाटील म्हणाले, ‘‘यापुढे विधिमंडळ व लोकसभेत महिला प्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यांना राज्य व देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे आहे. महिलांनी विविध कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षणे घ्यावीत. उद्योग व्यवसाय उभे करावेत. विश्वकर्मा योजनेचाही गरजू महिलांना लाभ मिळण्यासाठी केंद्रामार्फत प्रत्येक गावातील पात्र लाभार्थींना मार्गदर्शन केले जाईल.’’

इलेक्ट्रिक फोर व्हिलर सर्व्हिस टेक्निशियन मोफत प्रशिक्षणाचे माहिती ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने दिली. दुसऱ्या बॅचसाठी विनामूल्य प्रवेश असल्यामुळे इयत्ता दहावी उत्तीर्ण मुला-मुलींनी मंचर येथे रामा ऑटो प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले. पुष्पलता जाधव, सरस्वती शिंदे यांची भाषणे झाली.

लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून प्रत्येक महिलेला सन्मान मिळाला पाहिजे. प्रेमाने तिला विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्री-पुरुष समानता निर्माण झाली. असे म्हणणे उचित ठरेल.
- किरण वळसे पाटील, अनसूया महिला उन्नती केंद्र, मंचर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com