Sakal Swasthyam 2023 : ‘योगा, ध्यानातून महिला मानसिकदृष्ट्या कणखर’

Yoga Meditation : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यानंतर स्वराज्य रक्षणाची धुरा ताराराणी यांनी समर्थपणे सांभाळली.
Sakal Swasthyam
Sakal Swasthyam Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘तलवारबाजी, लाठीकाठीने पूर्वी महिला शारीरिक स्वास्थ्य राखत होत्या. हल्ली ही जागा योगा, मेडिटेशनने घेतली आहे. त्यामुळे महिला मानसिकदृष्ट्या कणखर होत आहे,’’ असे ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटातील कलाकारांनी सांगितले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यानंतर स्वराज्य रक्षणाची धुरा ताराराणी यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांचा इतिहास महाराष्ट्राला ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

Sakal Swasthyam
Sakal Swasthyam 2023 : त्याग हीच सर्वांत मोठी तपस्या : आध्यात्मिक गुरू श्री एम

या चित्रपटातील कलाकारांनी शनिवारी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमास भेट देत प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पा मारल्या. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुरभी हांडे, अभिनेता आशय कुलकर्णी, निर्माते अक्षय बर्दापूरकर व दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते.

Sakal Swasthyam
Sakal Swasthyam 2023 : पुण्यात एक ते तीन डिसेंबरला आरोग्यमेळा

सोनाली म्हणाली, ‘‘चित्रपटसृष्टीतील माझ्या १५ वर्षांच्या काळातील ताराराणींची भूमिका म्हणजे मैलाचा दगड आहे. यापूर्वी मी ‘हिरकणी’मध्ये ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. पण आता थेट भोसले घराण्यातील व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो.’’

जयसिंगराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती केल्याचे बर्दापूरकर यांनी सांगितले. मराठी चित्रपट इतर भाषांमध्येही भाषांतरित झाले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी असल्याचे जाधव यांनी सांगितले. सुरभी व अक्षय हेही आपल्या भूमिकेबद्दल बोलले. सोनालीने छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गारद म्हटली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com