
Parbhani News : कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत मुरुंबा (ता. परभणी) येथे बुधवारी (ता. २८) सोयाबीन पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर महिला शेतकरी शेती शाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रात्यक्षिकांसाठी सोयाबीन बियाणेवाटप करण्यात आले. रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या शेतीशाळेस आत्माच्या सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके, रजनीकांत देशमुख, प्रशांत ढोके, मुक्ता झाडे अनसूया झाडे, अंगद झाडे आदी उपस्थित होते.
या वेळी घोडके म्हणाल्या, की सोयाबीनची उत्पादकता वाढीसाठी रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे पेरणी करावी. मुरुंबा येथील ३२ शेतकऱ्यांच्या शेतावर ५० एकरांवर बीबीएफ तंत्रज्ञानाने सोयाबीनची पेरणी करण्याचे नियोजन आहे.
त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील यंत्रशक्ती विभागाच्या संशोधक अभियंता डॉ. स्मिता सोळंकी यांनी उपलब्ध करून दिलेल्या बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
पीक प्रात्यक्षिकांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एमएयूएस-६१२ या वाणांचे बियाणे तसेच बीजप्रक्रियेसाठी जैविक जिवाणूसंघ व ‘ॲग्रोवन’च्या अंकांचे वाटप महिला शेतकऱ्यांना करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.