Panchaganga River Pollution : अडीच वर्षांत पंचगंगा सांडपाणीमुक्त करा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Collector Kolhapur : जिल्हाधिकारी कार्यालयात काल (दि.२१) त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नाबाबत बैठक घेतली.
Panchaganga River Pollution
Panchaganga River Pollutionagrowon

River Pollution Kolhapur : ‘इचलकरंजी, कोल्हापूर महापालिकांनी आपले प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढील अडीच वर्षांत उभे करून पंचगंगा नदी सांडपाणीमुक्त करावी. नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठीचा विशेष प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला सादर करावा. नदीमधील जलपर्णी काढण्यासाठी व्यवस्था विकसित करावी,’ अशा सूचना आज जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल (दि.२१) त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नाबाबत बैठक घेतली. या बैठकीला महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी महापालिका, जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘कोल्हापूर महापालिकेतील सहा एम.एल.डी प्रक्रिया प्रकल्पाचे काम ऑक्टेबरअखेर पूर्ण करा. तसेच ४३ एम.एल.डी.क्षमता असणाऱ्या तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम सप्टेंबर महिन्यात सुरू करा.

कोल्हापूर शहरातील सात नाले प्रक्रिया प्रकल्पाकडे वळण्यासाठीचे आराखडा बनवून कार्यवाही करावी. इचलकरंजी येथील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ५२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाची कार्यवाही सुरू करावी. सर्व प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी पुढील अडीच वर्षांत पूर्ण करून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावेत. महापालिका, ग्रामपंचायत यामधील सांडपाणी नदीत जाणार नाही, अशी व्यवस्था करून नदी सांडपाणीमुक्त करावी.’

या बैठकीला महापालिका आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक प्रमोद माने, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, शहर जलअभियंता हर्षजित घाटगे, करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मासे मरण्याचे कारण काय?

नदीमध्ये मासे मरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचे नेमके कारण काय, याचा शोध मत्स्य विभागाने घ्यायचा आहे. नदीमधील मासेमारीचे ठेके बंद करण्यात आले आहेत.

Panchaganga River Pollution
Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

नदीकाठच्या गावांचा विशेष प्रस्ताव

पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांच्या काठी असणाऱ्या ८९ गावांचे सांडपाणी नदीत जाते. या गावांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे शक्य नाही. त्यामुळे या गावांचा विशेष प्रस्ताव बनवून तो राज्य शासनाला देण्याचे निश्चित करण्यात आले.

सोलापूरचा जैविक कचरा आलाच कसा?

सोलापूर येथील जैववैद्यकीय कचरा निर्मूलन करण्यासाठी कोल्हापुरात आणला होता. हा कचरा कोल्हापुरात आलाच कसा? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com