Maize New Variety : धान्यासह, हिरव्या चाऱ्यासाठी मक्याचे नवीन दोन वाण विकसित

कृषी विज्ञान केंद्र, बंगलोर येथील शास्त्रज्ञांनी मक्याचे एमएएच १४-१३८ आणि एमएएच १५-८४ हे दोन वाण विकसीत केले आहेत.
Maize New Variety
Maize New VarietyAgrowon
Published on
Updated on

मका हे रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पीक (Cash Crop) आहे. गहू आणि तांदळानंतर मका पीक (Maize Crop) भारतातील तिसरे महत्त्वाचे पीक म्हणून पुढे येत आहे. पोल्ट्री क्षेत्रात (Poultry Sector) मक्याला जागतिक बाजारपेठेत मोठया प्रमाणात मागणी आहे. स्वीट कॉर्न, (Sweet Corn) बेबी कॉर्न (Baby Corn) मक्याला देश-विदेशात मोठी मागणी आहे. मक्याबरोबरच मक्याचा चाराही उपयुक्त आहे. अशा दुहेरी उत्पादनासाठी मका पिकाची देशात मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. गेल्या दोन दशकांत मका लागवडीचे क्षेत्र ६ दशलक्ष हेक्टरवरून १० दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढले आहे. मका उत्पादनातही १२ दशलक्ष टनांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कमी खर्चात आणि कमी वेळेत चांगले उत्पादन घेण्यासाठी मक्याच्या सुधारित वाण निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. 

Maize New Variety
Paddy New Variety : विकिरण तंत्राच्या वापरातून भाताचे चार वाण विकसित

ही गरज लक्षात घेऊन अलीकडेच कृषी विज्ञान केंद्र, बंगलोर येथील शास्त्रज्ञांनी मक्याचे एमएएच १४-१३८ आणि एमएएच १५-८४ हे दोन वाण विकसीत केले आहेत. या वाणांपासून मक्याचे चांगले उत्पादन मिळते याशिवाय मका कणसांच्या काढणीनंतरही मक्याचा चारा हिरवा राहतो हे या वाणांचे खास वैशिष्ट आहे. त्यामुळे जनावरांना अधिक काळापर्यंत हिरवा चारा शेतातच उपलब्ध होतो. चारा हिरवा राहिल्यामुळे तो जनावरांना सहजपने पचतो. 

Maize New Variety
Tur New Variety : तुरीचे फुले तृप्ती, फुले कावेरी वाण राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित

वाणांची वैशिष्ट्ये काय आहेत?

- एमएएच १४-१३८ हे वाण विकसीत करण्यासाठी सुमारे ८ वर्षाचा कालावधी लागला. या वाणाला व्यावसायिक शेतीसाठीही मान्यता देण्यात आली आहे. 

- एमएएच १४-१३८ वाणाचा कालावधी १२० ते १३५ दिवसांचा असून, एकरी ३५ ते ३८ क्विंटल उत्पादन घेता येते.

- एमएएच १५-८४ या वाणाचा कालावधी ११५ ते १२० दिवसांचा आहे. हे वाण अद्याप व्यापारी तत्वावर लागवडीसाठी मंजूर झालेले नाही. 

- कणसांच्या काढणीनंतरही मक्याचा चारा हिरवा राहतो 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com