Tur New Variety : तुरीचे फुले तृप्ती, फुले कावेरी वाण राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून वाण विकसित; बीजोत्पादन घेता येणार
 Tur New Variety
Tur New VarietyAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने (Pulses Development Project) विकसित केलेले तुरीचे फुले तृप्ती (Phule Trupti) व फुले कावेरी हे वाण राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने दोन्ही वाण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या ८९ व्या बैठकीत हे वाण अधिसूचित करण्यात आले. त्यामुळे कृषी विद्यापीठासह शेतकरी कंपन्या, शेतकरी गट व अन्य बाबीतून बीजोत्पादन करता येणार आहे.

 Tur New Variety
Tur Import : तूर आयातीसाठी सरकारची धडपड

महाराष्ट्रात खरीप हंगामातील तूर हे महत्त्वाचे पीक आहे. तुरीचे राज्यात १२.३६ लाख हेक्टर क्षेत्र असून, १२.५२ लाख टन उत्पादन मिळते. तुरीची सरासरी उत्पादकता १०१३ प्रतिहेक्टर आहे. तूर पिकामध्ये अधिक उत्पादनक्षम व लवकर पक्व होणारे आणि मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची निर्मितीच्या दृष्टीने सुरू असलेल्या संशोधनातून फुले तृप्ती, फुले कावेरी वाण हे दोन्ही वाण फायदेशीर आहेत. हे वाण नीम-गरवे (मध्यम कालावधी) प्रकारातील असून अधिक उत्पादनक्षम आहेत.

 Tur New Variety
Tur Rate : तूर दरातील तेजी कायम राहणार

फुले तृप्ती (पी.टी.१०-१) हा वाण देशाच्या मध्य विभागातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती, बागायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. फुले कावेरी (पी.टी.११-४) हा वाण देशाच्या दक्षिण विभागातील तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि ओडिशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती, बागायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणांच्या निर्मितीमध्ये पीक पैदासकार व महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. एस. कुटे, डॉ. व्ही. एम. कुलकर्णी, श्री. वाय. आर. पवार, रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही. ए. चव्हाण, कीटकशास्त्रज्ञ डॉ. सी.बी. वायळ यांचे मोलाचे योगदान लाभले. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, तत्कालीन संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, तसेच विद्यमान संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार आणि अखिल भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर येथील तूर संशोधन प्रकल्पाचे समन्वयक डॉ. इंद्रप्रकाश सिंग यांनी मार्गदर्शन केले

 Tur New Variety
Tur Rate : देशात यंदा तुरीची टंचाई भासणार? | Agrowon | ॲग्रोवन

वाणांचे वैशिष्ट्ये
फुले तृप्ती (पी.टी.१०-१) ः या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी २२.६६ क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी ३२.०० क्विंटल इतकी आहे. प्रचलित वाण फुले राजेश्‍वरी आणि बी.डी.एन.-७११ या वाणांपेक्षा या वाणांने अनुक्रमे ३३.४५ टक्के आणि ४२.९७ टक्के अधिक उत्पादन दिलेले आहे. या वाणाचा पक्वता कालावधी १६५ दिवस आहे. या वाणाचे फिकट तपकिरी रंगाचे टपोरे दाणे असून १०० दाण्यांचे वजन १०.८१ ग्रॅम आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक असून, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा कमी प्रादुर्भाव दिसून आला.

 फुले कावेरी (पी.टी.११-४) ः हा वाण देशाच्या दक्षिण विभागातील तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि ओडिशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती, बागायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. सरासरी प्रति हेक्टरी १५.९१ क्विंटल उत्पादन व उच्च उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी २४.०० क्विंटल असून, प्रचली वाण फुले राजेश्‍वरी या वाणांपेक्षा २२.८६ टक्के अधिक उत्पादन दिलेले आहे. पक्वता कालावधी १६४ दिवस असून, फिकट तपकिरी रंगाचे अधिक टपोरे दाणे असून, १०० दाण्यांचे वजन ११.५२ ग्रॅम आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक असून, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा कमी प्रादुर्भाव दिसून आला.

कोट....
तुरीचे फुले तृप्ती, फुले कावेरी वाण शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारे आहे. खास करून तुरीवर अलीकडच्या काळात आढळणाऱ्या मर, वांझ रोगाला प्रतिकार करण्यासाठी हा वाण फायदेशीर आहे.
- डॉ. एन. एस. कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले विद्यापीठ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com