Dharashiv Windmill Scam : शेतकऱ्यांच्या मारहाणीची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा

Farmer Fraud : पवनचक्की कंपन्यांचे एजंट गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक देतात, पण चेक बाऊन्स होतात.
Maharashtra Assembly
Maharashtra AssemblyAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांकडून स्थानिक गुंड आणि पोलिस अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक आणि मारहाणीच्या सर्व तक्रारींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी (ता. ४) विधानसभेत केली.

कळंबचे आमदार कैलास घाटगे पाटील यांनी या बाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर भोयर यांनी घोषणा केली. पवनचक्की कंपन्यांचे एजंट गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण करतात, शेतकऱ्यांना चेक देतात, पण चेक बाऊन्स होतात. अनेकदा खोटे संमतिपत्र तयार केले जाते. या सगळ्याची तक्रार घेऊन शेतकरी पोलिसांकडे गेले तर उडवाउडवीची उत्तरे दिली जाता.

कंपनीचे अधिकारी म्हणतात आम्ही सगळ्यांना पैसे दिले आहेत, आमचे काही होणार नाही, जो शेतकरी विरोध करेल तो गायब होतो, अशी धमकी देतात. पोलिस शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना मारहाण करतात, पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांना डांबून ठेवून पवनचक्की कंपन्या शेतकऱ्यांच्या शेतात काम करतात, असे गंभीर आरोप शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कळंबचे आमदार घाटगे पाटील यांनी केले.

आता पोलिसच ‘आका’ झालेत

पवनचक्की कंपन्यांची एवढी हिंमत कशी येते, पोलिस काय करतात, सरकार अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असे सवाल पाटील यांनी विधानसभेत विचारले. याआधी काहीजणांना आका म्हटले जायचे. आता काही पोलिस अधिकारीच आका झाले आहेत, अशी संतप्त टीका पाटील यांनी केली.

Maharashtra Assembly
Dharashiv News : धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची दादागिरी थांबवा ; आमदार कैलास घाडगे पाटील यांची विधानसभेत मागणी; क्षेत्र बळकावण्याच्या तक्रारी

आमदार लक्षवेधीसाठी पंढरपूरवरून परत

आमदार कैलास पाटील हे पंढरपूरला गेले होते. मात्र, त्याची लक्षवेधी सूचना आजच्या कामकाजात लागल्यानंतर लगेचच ते मुंबईत आले. यांचा उल्लेख गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केला.

Maharashtra Assembly
Farmer Fraud: शेतकऱ्यांची १४५ कोटींनी फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पोलिस महानिरीक्षकांमार्फत चौकशी

पवनचक्की प्रकरणी ३१३ तक्रारी आल्या होत्या, त्यातील २१० तक्रारी निकाली निघाल्या आहेत. तर १०३ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. धाराशीव जिल्ह्यात जे प्रकार होतात त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणांची त्या विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

चेक बाऊन्स प्रकरणातही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, तसेच खोटी संमतीपत्रे प्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना महानिरीक्षकांना येतील. ज्या पोलिस अधिकाऱ्याकडे हे काम असेल त्यांच्याकडून हे काम काढून लवकरात लवकर याची चौकशी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री भोयर यांनी विधानसभेत दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com