Soybean Price : सोयाबीनची दरवाढ हंगामात टिकेल का?

Soybean Update : हा दर ६९० रुपयांनी वधारून सरासरी ४,७०५ रुपयांवर गेला असला तरीही हमीदराच्या तुलनेत १८७ रुपयांनी कमीच आहे.
Soybean Price
Soybean PriceAgrowon
Published on
Updated on

Amravati News : केंद्र सरकारच्या खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयाचे परिणाम स्थानिक बाजारपेठेत उमटू लागले आहेत. सोयाबीनच्या सरासरी ४,११५ रुपयांवरील दरांमध्ये सुधारणा झाली आहे. हा दर ६९० रुपयांनी वधारून सरासरी ४,७०५ रुपयांवर गेला असला तरीही हमीदराच्या तुलनेत १८७ रुपयांनी कमीच आहे. हे दर हंगाम सुरू होण्यापूर्वीचे असून ऐन हंगामात आवक वाढल्यानंतरही टिकतील का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.

राज्यात ५१.५२ लाख हेक्टरमध्ये यंदा सोयाबीनचा पेरा आहे. तर विदर्भात अमरावती विभागात १५.१८ लाख व नागपूर विभागात २.८५ लाख असे एकूण १८.०४ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यंदा विदर्भासह मराठवाडा व सोयाबीन उत्पादक पट्ट्यात झालेली अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे सोयाबीनच्या उत्पादन सरासरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Soybean Price
Soybean Crop Issue : नांदेडला पक्वतेपूर्वीच सोयाबीन झाले पिवळे

केंद्राने ही शक्यता लक्षात घेता सोयापेंड आयातीचा निर्णय आधीच घेतल्याने बाजारातील सोयाबीनचे दर चांगलेच पडले होते. सरासरी ४,१०० रुपये दर राज्याच्या बहुतांश बाजार समितींमध्ये सोयाबीनला मिळत होता. आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत केंद्राने खाद्यतेलांच्या आयातीवरील शुल्कात वाढ केल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारात पडला आहे.

Soybean Price
Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

या निर्णयानंतर पश्‍चिम विदर्भातील बाजारांमध्ये सोयाबीनचे दर दुसऱ्याच दिवशी २०५ रुपयांनी वधारलेत. जुन्या व साठवणीतील सोयाबीनला गेल्या महिन्यात सरासरी ४,११५ रुपयांचा भाव होता.

तर गेल्या सप्ताहात तो सरासरी ४,५०० रुपयांवर गेला. केंद्राच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयानंतर एकाच दिवसात भाव वधारल्याचे चित्र स्थानिक बाजारात दिसून आले. येथील बाजार समितीत सोयाबीनला किमान ४६०० व कमाल ४८११ रुपये भाव मिळाला. सरासरी हा दर ४७०५ रुपये होता. एकाच दिवसांत २०५ रुपयांची तर गेल्या महिन्याच्या तुलनेत ६९० रुपयांची वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com