Agrowon Podcast : हळदीचे उत्पादन यंदा वाढेल का?

Market Bulletin : दसरा आणि दिवाळीत मसाल्यांना मागणी वाढत असते. हळदीलाही उठाव चांगला असतो. त्यामुळे हळदीचे भाव वाढलेले असतात. पण यंदा हळदीचे भाव ऐन दिवाळीच्या तोंडावरही स्थिर आहेत.
Market Bulletin
Market Bulletin Agrowon
Published on
Updated on

1. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे १२.९४ डाॅलरवर पोचले. तर सोयापेंडच्या वायद्यांनी काही महिन्यांनंतर ४४४ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात आज पुन्हा क्विंटमागं ५० रुपयांची वाढ झाली. सोयाबीनचे भाव काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

2. देशातील बाजारात कांद्याचे भाव काहिसे वाढले आहेत. सध्या बाजारातील कांदा आवक सरासरीच्या तुलनेत कमी झाली आहे. परिणामी कांद्याच्या भावात सुधारणा झाली. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात कांद्याची आवक आणखी कमी होत जाऊन दरात सुधारणाही होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market Bulletin
Agrowon Podcast : तुरीचे भाव वाढल्यानंतर ग्राहकांची मसूरला पसंती

3. बाजारात सध्या ज्वारीला चांगला उठाव आहे. पण बाजारातील ज्वारीची आवक घटलेली आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत दिसतात. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. देशात यंदा कमी पावसामुळे ज्वारी पिकालाही फटका बसत आहे. परिणामी पुढील काळातही ज्वारीचे भाव तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

4. राज्यातील बाजारात सध्या काकडीचे भाव स्थिर आहेत. काकडीची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून वाढलेली दिसते. तर काकडीचा उठाव मात्र स्थिर आहे. त्यामुळे काकडीच्या भागात मागील काही दिवसांमध्ये नरमाई आली होती. सध्या काकडीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळतो आहे. काकडीचा भाव पुढील काही दिवस दबावातच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Market Bulletin
Agrowon Podcast : टोमॅटोला अपेक्षित दराची अजूनही प्रतिक्षाच

5. दसरा आणि दिवाळीत मसाल्यांना मागणी वाढत असते. हळदीलाही उठाव चांगला असतो. त्यामुळे हळदीचे भाव वाढलेले असतात. पण यंदा हळदीचे भाव ऐन दिवाळीच्या तोंडावरही स्थिर आहेत. हळदीच्या भावात मागील चार महिन्यांमध्ये चांगली तेजी आली होती. हजर बाजारातील भाव २० हजारांपर्यंत गेला होता. पण वाढलेल्या मागणीत हळदीची मागणी कमी झाली होती. त्यानंतर भाव कमी होत गेले. हळदीच्या भावाने मागील महिनाभरापासून १३ हजारांची पातळी गाठलेली आहे. सणांच्या मागणीमुळेही भावात वाढ दिसत नाही. सध्या हळदीचे वायदे १४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तर हजर बाजारात हळदीला १३ हजार ते १५ हजारांचा भाव मिळत आहे.

सरत्या हंगामातील हळदीचे उत्पादन घटले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात हळदीचा तुटवडा असल्याने मागणी वाढली होती. नेमकं याच काळात हळदीला देशात कमी भाव होता. यामुळे हळदीची निर्यात वाढली. परिणामी देशातील दराला आधार मिळून भाव वाढले होते. सध्याचा भावही गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. यंदाही लागवड झालेल्या हळदीला कमी पाऊस आणि पावसातील खंडाचा फटका बसत आहे. यामुळे हळदीच्या बाजारात पुढील काही दिवसांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच हळदीचे भाव आणखी काही महिने तेजीतच राहू शकतात, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com