Wheat Procurement : सरकारचं गहू खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण होणार का? | राज्यात पावसाचा दणका | राज्यात काय घडलं?

केंद्र सरकारनं यंदा ३७.२९ दशलक्ष टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार १२ मे पर्यंत गहू खरेदी २५.३० दशलक्ष टनांपर्यंत पोहचली
Wheat Procurement
Wheat Procurement Agrowon

गहू खरेदीचं उद्दिष्ट धोक्यात?

केंद्र सरकारनं यंदा ३७.२९ दशलक्ष टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार १२ मे पर्यंत गहू खरेदी २५.३० दशलक्ष टनांपर्यंत पोहचली. त्यामुळे गहू खरेदीचं सरकारचं उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, याबद्दल खात्री नसल्याचं जाणकार सांगतात. गेल्यावर्षी याच दरम्यान गहू खरेदी २५.६८ दशलक्ष टनांवर पोहचली होती. भारतीय अन्न महामंडळाकडून गव्हाची खरेदी केली जाते.

एप्रिल-मे महिन्याच्या दरम्यान गव्हाची ९० टक्के खरेदी केली जाते. परंतु यंदा शेतकऱ्यांचा खुल्या बाजारात गहू विक्रीकडे कल दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू साठवून ठेवला. कारण जून महिन्यात अन्न महामंडळ गहू खरेदी बंद करेल त्यानंतर खुल्या बाजारात दर अधिक मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये गहू पिकाला अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांचा फटका बसला होता. त्यामुळे उत्पादनात घट आली.

त्यात केंद्र सरकारनं गहू निर्यात बंदीचा दणका दिला. परिणामी गव्हाचे दर दबावात राहिले. उत्पादनात घट आल्यामुळं गहू आयात करावा लागेल, अशी चर्चाही सुरू होती. त्यामुळं बफर स्टॉकसाठी सरकार हात धावून खरेदीच्या मागे लागलं आहे. भारतीय अन्न महामंडळाकडील साठा १ एप्रिल रोजी १५ वर्षांच्या निच्चांकी पातळीवर पोहचला होता.

Wheat Procurement
Wheat Production : गव्हाची उत्पादकता कमी

पावसाचा राज्यात दणका

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरूच आहे. सोमवारी राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पुणे शहरात वादळी वाऱ्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली. विविध भागात गारपीट झाली. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. घरावरची छत उडून गेली तर काही ठिकाणी गोठ्यांवरची पत्रं उडल्याच्या घटना घडल्या.

नगर जिल्ह्यात दहा महसूल मंडळात जोरदार पावसानं झोडपून काढलं तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपुर, वर्धा जिल्ह्यात अवकाळीनं शेती पिकांचं नुकसान झालं. तर छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसानं दणका दिला. नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातही पावसाच्या सरीनी हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळं फळबागा, भाजीपाला पिकांचं नुकसान केलं. हळद, ज्वारी, उन्हाळी पिकं आंबा पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले. नुकसानीची पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com