Sugarcane Bill : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का?

Sugarcane FRP : खरिपातील पिकांकडून निराशा झाल्याने ऊस सभासद शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी गेल्या वर्षीच्या हंगामातील दुसरा हप्ता काढून दिवाळी गोड करणार का? हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Satara News : राज्यभर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व साखर कारखानदार सहभागी झाले आहेत. खरिपातील पिकांकडून निराशा झाल्याने ऊस सभासद शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी गेल्या वर्षीच्या हंगामातील दुसरा हप्ता काढून दिवाळी गोड करणार का? हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. दरम्यान, या हंगामासाठी मजूर दाखल होऊ लागले आहेत.

जिल्ह्यात अतिपावसाचा फटका खरिपातील पिकांना बसला आहे. सणासुदीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. यात आता ऊस गाळप हंगाम सुरू होत आहे. महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत ऊस गाळप कारखाना आहे.

Sugar Factory
Sugarcane Bill : पावसाने खरीप वाया; ऊसबिलेही नाहीच

या हंगामात साखर कारखान्यांची संख्याही वाढली असून खासगी, सहकारी मिळून १८ कारखाने गाळप करणार आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून, यामध्ये बहुतांशी कारखाने हे लोकप्रतिनिधींचे असून, हे निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरत असतात. या लोकप्रतिनिधीची कारखान्याचे सभासद ही त्यांची व्होट बॅंक आहे.

मात्र, काही कारखान्यांनी हंगाम आणि निवडणूक एकाचवेळी नको असल्याने हंगाम जवळपास एक महिना पुढे ढकलण्यात आला आहे. या निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व कारखानदार सहभागी झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधींकडून जादा दर देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तोंड गोड होण्याची आशा आहे.

Sugar Factory
Sugarcane Bill : पडळ कारखान्याकडून १५१ प्रमाणे बिल जमा

जिल्ह्यात यावर्षी सुमारे ८५ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. हा ऊस वेळेत जाण्यासाठी कारखान्यांना नियोजन करावे लागणार आहे. त्यातच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अजूनही शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी कारखानदारांकडून जादा दर देण्याबरोबर गत हंगामातील दुसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही दुसरा हप्ता कोणत्याही कारखान्यांनी दिलेला नाही.

दुसरीकडे निवडणूक असल्याने शेतकरी संघटना आक्रमक होऊन ऊस दराचे आंदोलन अधिक तीव्रतेने करू शकतात. स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार संकेत माजी खासदार राजू शेट्टीने दिल्याने प्रचारात उसाचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

मागील चार ते पाच हंगामात ऊसतोडणी मजूर ही समस्या अनेक कारखान्यांना जाणवत आहे. यामुळे ऊस उशिरा तुटला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हा मतदार शेतकरी नाराज होऊ नये, यासाठी वेळेत तोडणी यंत्रणा विस्कळित होऊ नये यांची काळजी कारखानदारांना घ्यावी लागणार आहे.

दृष्टिक्षेपात...

निवडणुकीच्या धामधुमीत ऊस गाळप हंगाम

निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व साखर कारखानदार सहभागी

स्वाभिमानी निवडणूक लढवणार असल्याने प्रचारात उसाचा मुद्दा केंद्रस्थानी

जिल्ह्यातील १८ कारखान्यांकडून गाळप हंगामाची तयारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com