Industrial National Highway : औद्योगिक राष्ट्रीय महामार्ग रद्द करणार : वळसे पाटील

Dilip Walse Patil : नियोजित पुणे- नाशिक औद्योगिक राष्ट्रीय महामार्गाला जुन्नर, आंबेगाव, शिरूर व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध लक्षात घेता हा महामार्ग रद्द होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फाइलवर स्वाक्षरी झाली आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilAgrowon
Published on
Updated on

Manchar News : ‘‘नियोजित पुणे- नाशिक औद्योगिक राष्ट्रीय महामार्गाला जुन्नर, आंबेगाव, शिरूर व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध लक्षात घेता हा महामार्ग रद्द होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फाइलवर स्वाक्षरी झाली आहे. येत्या चार-पाच दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य शासन रस्ता रद्द झाल्याची अधिसूचना काढणार आहे,’’ अशी माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Dilip Walse Patil
Pune-Nashik Highway : पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी घेतली थोरात यांची भेट

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने नियोजित महामार्ग रद्द व्हावा, याबाबत आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १५) रात्री वळसे पाटील यांच्याबरोबर चर्चा केली. शिष्टमंडळात शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी, समन्वय वल्लभ शेळके, जी. के. औटी, एम. डी. घंगाळे, मोहन नायकोडी, प्रतीक जावळे, काठापूरचे सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे, कान्हू करंडे, दिलीप जाधव, सुरेश बोरचटे, निवृत्ती करंडे, हेमंत करंडे, अविनाश आठवले, गोविंद हाडवळे आदी शेतकरी होते.

Dilip Walse Patil
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाबाबत संदिग्धता कायम

या वेळी बाळासाहेब औटी म्हणाले, ‘सध्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहे नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे विस्तारीकरण करावे, पण नव्याने समांतर रस्ता करू नये. २०१३ च्या केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याची जशीच्या तशी अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.

आंबेगाव, जुन्नर, शिरूर, संगमनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांचा रस्त्याला विरोध आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली आहे. मी व आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी पुढाकार घेतला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेले आंदोलन थांबवावे.
दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com