Water Shortage In Jalgaon : जळगावात जलसाठ्यात होऊ लागली झपाट्याने घट

जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या सिंचन प्रकल्पात सरासरी ४९.२०, तर अन्य लघु व मध्यम प्रकल्पांत सरासरी ४५.७२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
Water shortage
Water shortage Agrowon
Published on
Updated on

Jalgaon Water News : जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या सिंचन प्रकल्पात सरासरी ४९.२०, तर अन्य लघु व मध्यम प्रकल्पांत सरासरी ४५.७२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

गिरणा ३०.४४ टक्के, तर हतनूर प्रकल्पात ६३.४३ टक्के साठा आहे. दोन्ही प्रकल्पांतील पातळी झपाट्याने खाली गेली आहे.

गिरणा कालवा समितीच्या समन्वयातून सिंचनाचे तीन, तर पेयजलाची दोन, अशी पाच आवर्तने होती. त्यापैकी पेयजलाची दोन आवर्तने शिल्लक आहेत. मात्र, तिसऱ्या आवर्तनादरम्यान सलग महिनाभरापासून गिरणा डावा कालव्यातून ६० क्यूसेक पाणी सुरू आहे.

सद्यःस्थितीत हवामानाचा अंदाज आणि वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहाता ‘अल निनो’मुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत जिल्ह्याच्या प्रकल्पीय पातळीत प्रचंड घट होत असून, शासन स्तरावरून संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी किमान तीन ते चार महिन्यांसाठी जलनियोजन आराखडा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Water shortage
Water Shortage : संभाव्य टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पावर भुसावळसह अमळनेर, चोपडा व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे, तर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोलसह अमळनेर तालुक्यातील काही भाग, अशा १५० ते २०० गावांचा पाणीपुरवठा योजना तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगावसह त्या तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत.

असे असताना गिरणा प्रकल्पात केवळ ३०.४४ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने पाणीटंचाईचे संकट जाणवण्याची शक्यता आहे.

वाघूर प्रकल्पात ७४.१२ टक्के पाणीसाठा

जळगाव शहराला पूर्वी गिरणा-दापोरा बंधारा पंपिंग स्टेशन, तसेच भुसावळ-तापी प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर वाघूर प्रकल्प पूर्णत्वानंतर जळगावकरांसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

वाघूर प्रकल्पात सद्यःस्थितीत एकूण साठा २४८.५५ दशलक्ष घनमीटर, जिवंत साठा १८४.२३ दशलक्ष घनमीटर अर्थात, उपयुक्त जलसाठा ७४.१२ टक्के आहे. अजून तरी दोन वर्षे पुरेसा पाणीसाठा असल्याने टंचाई होणार नसल्याचा दिलासा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com