Wildlife Census : वैशाख पौर्णिमेच्या रात्री काटेपूर्णा अभयारण्यात प्राणिगणना

katepurna Sanctuary : सुमारे ६५०० हेक्टरमध्ये पसरलेल्या या अभयारण्यात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांभोवती १० मचाण उभारण्यात आले होते. प्राणी गणनेसाठी पौर्णिमा ही विशेष मानली जाते.
Katepurna Census
Katepurna CensusAgrowon
Published on
Updated on

Washim News : बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्र प्रकाशात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वन्यजीवांची गणना करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या वन्यप्रेमींनी रात्रभर मचाणावर जागून या निसर्ग अनुभवाचा आनंद लुटला.

चंद्राच्या लख्ख प्रकाशात न्हालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या रात्री, काटेपूर्णा अभयारण्यात वन्यजीव आणि पक्ष्यांची गणना उत्साहात पार पडली. सोमवारी (ता. १२) दुपारी दोनपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी पर्यटकांनी मचाणावरून रात्रभर निरीक्षण करीत प्राण्यांच्या हालचालींच्या नोंदी घेतल्या.

Katepurna Census
Wildlife Preservation: साडेचार लाख माकडांना सोडले नैसर्गिक अधिवासात

सुमारे ६५०० हेक्टरमध्ये पसरलेल्या या अभयारण्यात नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांभोवती १० मचाण उभारण्यात आले होते. प्राणी गणनेसाठी पौर्णिमा ही विशेष मानली जाते. चंद्रप्रकाश तेजस्वी असतो आणि उन्हामुळे प्राणी रात्री पाण्यासाठी बाहेर पडतात.

काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, चितळ, सांबर, काळवीट, नीलगाय, तसेच अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातीही आढळतात. प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांची किलबिल आणि निसर्गाच्या सान्निध्यात मिळालेला अनुभव वन्यप्रेमींना आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. या वेळी काही वन्यप्रेमींना बिबट्याचेही दर्शन झाल्याने त्यांचा आनंद वेगळाच होता.

Katepurna Census
Wildlife Water Crisis : हरणांसह वन्यप्राण्यांसाठी टॅंकरने पाणवठ्यांमध्ये पाणी

प्राणिगणनेत नोंद झालेले एकूण प्राणी - ३६९

बिबट - ३, चितळ - ८७, चिंकारा - २, अस्वल - १, निलगाय - ६४, रानडुक्कर - ५७, कोल्हा - ९, मोर - ३७, उदमांजर- ५, रानमांजर - ६, सायाळ - ११, ससे - ०४, भेकडी - ५, माकड - ७५, रानकुत्रा - ३

पौर्णिमेच्या रात्री दरवर्षी प्राणिगणना केली जाते. यात निसर्ग प्रेमीही सहभागी होतात. निसर्ग अनुभव या उपक्रमामध्ये काटेपूर्णा अभयारण्यात एकूण १० मचाण पाणवठ्याच्या शेजारी उभारले होते. ऑनलाइन पद्धतीने याचे बुकिंग करून, निसर्गप्रेमींनी रात्रभर याचा अनुभव घेतला. रात्री आभाळ व मॉन्सूनपूर्व पाऊस परिस्थितीमुळे प्राणिगणनेवर थोड्या प्रमाणात फरक पडला.
- पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, काटेपूर्णा-सोहळ वन्यजीव अभयारण्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com