Mahila Mahamelava : बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित १९ रोजी मेळावा

Women's Empowerment Campaign : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या महिला महामेळाव्याला देखील मार्गदर्शन करणार आहेत,
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Buldana News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (ता. १९) बुलडाणा दौऱ्यावर येत असून ते विविध महापुरुष स्मारकांच्या लोकार्पणासोबतच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या महिला महामेळाव्याला देखील मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

बुलडाणा शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच शिवरत्न शिवा काशिद, संत गाडगेबाबा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व बाल शिवाजी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई स्मारक,

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : राज्याच्या विकास, कल्याणासाठी भीमाशंकराला साकडे : मुख्यमंत्री शिंदे

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक, भगवान वीर एकलव्य स्मारक, संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, वसंतराव नाईक स्मारक, राजर्षी शाहू महाराज स्मारक, महात्मा बसवेश्वर स्मारक, अहिल्याबाई होळकर स्मारक, तानाजी मालुसरे स्मारक, नरवीर बाजीप्रभू देशपांडे स्मारक उभारण्यात आले आहेत.

CM Eknath Shinde
Mazi Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहीण’साठी शून्य ठेव बँक खाते उघडणार

याशिवाय जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे लोकार्पण, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे नवीन भूसंपादन व पुनर्वसन कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण, कृषी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार असल्यामुळे जिल्ह्यातील आणि मतदार संघातील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार गायकवाड यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com