WildBoar Attack: पेरलेल्‍या बियाण्यांचा रानडुकरांकडून फडशा

Farmer Loss: पेरणी केलेले भुईमुगाचे बियाणे रानटी डुकरांच्या कळपाने काही तासतच उद्‌ध्वस्त करून फस्त केल्याची घटना विंग (ता. कऱ्हाड) येथे घडली. विंगसह परिसरात वन्यप्राण्याचा उपद्रव नित्याचाच बनला आहे.
WildBoar Attack
WildBoar Attack
Published on
Updated on

Satara News: पेरणी केलेले भुईमुगाचे बियाणे रानटी डुकरांच्या कळपाने काही तासतच उद्‌ध्वस्त करून फस्त केल्याची घटना विंग (ता. कऱ्हाड) येथे घडली. विंगसह परिसरात वन्यप्राण्याचा उपद्रव नित्याचाच बनला आहे.

रानटी डुकराचे कळप विविध परिसरात वास्तव्यास असून, तेथूनच उभी पिके फस्त करत आहेत. खास करून वाघझरा पायथा परिसरात त्यांचे वास्तव्य कायम आहे. त्या परिसरात नुकतेच पेरणी केलेल्या भुईमुगाच्या बियाण्यावर डुकराच्या कळपाने डल्ला मारला.

WildBoar Attack
Wild Elephant Attack : कोलझरमध्ये हत्तींकडून नारळ, सुपारी पिकांचे नुकसान

संपूर्ण १५ गुंठ्यांतील पेरलेले बियाणे रातोरात फस्त केले आहे. विंग (ता. कऱ्हाड) येथील मोरेमाळ परिसरात रामचंद्र गणपती खबाले या शेतकऱ्याच्या शेतात ही घटना घडली.

गुरुवारी शेतात भुईमुगाची पेरणी केली होती. शुक्रवारी सकाळी रानडुकरांच्या कळपाने शेत उद्‌ध्वस्त करून १५ गुंठ्यांतील बियाणे फस्त केले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा मेहनत करून पेरणीसाठी खर्च येणार आहे. वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी.
- अनिता खबाले, शेतकरी, विंग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com