Irrigation Water Testing: सिंचनाचे पाणी तपासण्याची गरज का असते?

Water Quality in Farming: शेतीमध्ये वापरले जाणारे पाणी योग्य आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर पाणी परीक्षण केल्यास जमिनीचे नुकसान टाळून चांगले उत्पादन मिळवता येते.
Role of water testing in sustainable farming
Role of water testing in sustainable farmingAgrowon
Published on
Updated on

Soil Fertility: शेतीत चांगले उत्पादन मिळवण्यासाठी फक्त बियाणे आणि खतच नव्हे, तर सिंचनासाठी वापरले जाणारे पाणीही तितकेच महत्त्वाचे असते. पण ते पाणी पिकांसाठी योग्य आहे का, हे जाणून घेणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. अनेक वेळा शेतकरी पाण्याची गुणवत्ता तपासल्याशिवाय सिंचन करतात, ज्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता कमी होते आणि उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे सिंचनाच्या पाण्याची नियमित तपासणी करणे खूप गरजेचे ठरते.

पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतात. हे क्षार जास्त प्रमाणात असल्यास जमिनीत साठून राहतात आणि जमिनीचा पोत बदलतात. पाणी परीक्षण केल्याने जमिनीत क्षार साचणं टाळता येते आणि मातीची गुणवत्ता टिकवून ठेवता येते. तसेच योग्य प्रमाणात खतांचा वापर करण्यासाठी मदत होते, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

Role of water testing in sustainable farming
Saline Water Problem: सिंचनाच्या पाण्यात क्षार वाढण्याची कारणे आणि त्यावर उपाय

पाणी तपासताना त्याचा सामू, क्षारता, तसेच कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन यांसारख्या घटकांचे प्रमाण तपासले जाते. या घटकांचे प्रमाण जास्त किंवा कमी असल्यास पिकांवर वेगवेगळे परिणाम दिसून येतात.

जसे, पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड किंवा सल्फेट जास्त असल्यास माती वरून भुसभुशीत वाटते, पण पिकांच्या मुळांची वाढ नीट होत नाही आणि पाने पिवळी पडू लागतात. दुसरीकडे, सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास माती घट्ट व कठीण होते, ज्यामुळे पाण्याचा निचरा कमी होतो आणि मुळांना हवा मिळत नाही.

Role of water testing in sustainable farming
Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

पाणी खराब असल्याची लक्षणे

सिंचनाचे पाणी खराब असल्यावर पिकांची वाढ मंदावते, पाने पिवळी पडतात, माती घट्ट किंवा खूप सैल होते. पाण्याचा निचरा नीट होत नाही आणि उत्पादनात गट पहायला मिळते. पिकामध्ये वाढ मंदावणे आणि पिवळे पडण्याची शक्यता बऱ्याचदा होत असते. त्यावर शेतकरी खत देतात. त्यामुळे खर्चात वाढ होते. त्यामुळे आधी तपासणी केल्यास पिकाला गरजेनुसार खते देणे शक्य होते.

या सर्व समस्यांवर योग्य वेळी उपाय करण्यासाठी पाण्याची तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमितपणे पाण्याची चाचणी करून त्यानुसार सिंचन व खत व्यवस्थापन करावे, जेणेकरून जमिनीचे आरोग्य टिकून राहील आणि चांगले उत्पादन मिळेल, असा सल्ला धुळ्याच्या कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ, डॉ. अतिश पाटील यांनी सांगितले.

डॉ. अतिश पाटील, ९९२२८१७९१८

मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, धुळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com