Kolhapur News: आजरा तालुक्यात यंदा थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. थंड वातावरण रब्बी पिकांसाठी पोषक असते. तालुक्यात १६५ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झालेली आहे. पिके चांगली तरारली असून, हरभरा पिकासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहेत..तालुक्यात वीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड होत होती. पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाल्याने पाणीसाठे वाढले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढलेले आहे. वीस वर्षांपूर्वी चार हजार हेक्टरवर असलेले उसाचे क्षेत्र आता सात हजार हेक्टरवर गेले आहे. परिणामी रब्बी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. वन्यप्राण्यांचा होणारा त्रास रब्बीचे क्षेत्र घटण्याला कारणीभूत आहे..Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा योजनेत एक लाख १५ हजार अर्ज दाखल.तालुक्यात २१६ हेक्टर इतके रब्बी पिकांखालील सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा पाऊसमान लांबल्याने पेरणीला विलंब झाला. त्यामुळे काही गावांत रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. यंदा तालुक्यात १६५ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभऱ्याचे पीक आहे..हरभऱ्यासाठी यंदा हवामान पोषक आहे. थंडीचे वातावरण तयार झाल्याने हरभरा उत्पादनात वाढ होणार आहे. हे पीक तीन महिन्यांचे असून, चांगलेच तरारलेले आहे. त्याला घाटे धरायला सुरुवात झाली आहे. उत्तूरसह परिसरात मुमेवाडी, बहिरेवाडी, पेंढारवाडी, आरदाळ, हालेवाडी, महागोंड, चव्हाणवाडी, चिमणे, करपेवाडी, मडिलगे, वडकशिवाले, हालेवाडी या गावांत रब्बीची लागवड झाली आहे..Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बीचा शंभर टक्के पेरा.दृष्टिक्षेपात रब्बीची लागवडहरभरा : १३५इतर तृणधान्ये : ३०इतर कडधान्ये : ४०एकूण : १६५.हरभरा व अन्य रब्बी पिकांसाठी हवामान पोषक आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस लांबल्याने जमिनीत ओलावा राहिला. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या वेळेत होऊ शकल्या नाहीत. तरीसुद्धा पीक परिस्थिती चांगली आहे.विजयसिंह दळवी, मंडल कृषी अधिकारी, आजरा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.