Farming in El nino Low Rainfall: यंदा हवामानशास्त्र विभागाने पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या सोबतीने पावसामध्ये खंड पडण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. तसेच युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या टंचाईची भीती कायम मनात आहे. अशा परिस्थितीत कमी पाणी, कमी खत आणि प्रतिकुल हवामानात तग धरणाऱ्या, चांगले उत्पादन देणाऱ्या आणि बाजारात मागणी असणाऱ्या भरडधान्याची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरु शकते..भरडधान्याचे फायदेभात, सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांच्या तुलनेत भडधान्यांना अत्यंत कमी पाणी लागते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रासाठी भरडधान्य उत्तम पिके आहेत.मानवी आहारात या पिकांचे महत्त्व खूप वाढले आहे. यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात..Millet Business: मंजूषा यांचा ‘मिलेट्स’ उद्योग नावारूपाला.सध्या लोकांमध्ये आरोग्याबद्दल जागरुकता वाढत आहे. त्यामुळे भरडधान्याची मागणी निर्माण झाली असून त्याला उत्तम बाजारपेठ तयार होत आहे.भरडधान्य पिके ही काटक असतात. त्यांना फार रासायनिक खते लागत नाहीत, महागडी कीटकनाशके आणि बुरशीनाशकेही लागत नाहीत. ही पिके कीड आणि रोगांना सहज तोंड देतात. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च फार कमी असतो..जमिनीनुसार भरडधान्याची निवडभरडधान्यामध्ये बाजरी, ज्वारी, वरई, नाचणी, कोदरा, कंगणी (फॉक्सटेल मिलेट), राजगिरा या पिकांचा समावेश होतो.हलक्या, कमी खोलीच्या आणि मुरमाड जमिनीत बाजरी, नाचणी आणि भगर/ वरई/ राळा या पिकांचा समावेश होतो. बाजरी ही अत्यंत काटक असून कमी पाऊस आणि हलक्या, वालुकामय किंवा मुरमाड जमिनीत उत्तम येते.नाचणी म्हणजेच रागी हे पीक डोंगरउताराच्या, हलक्या आणि वरकस जमिनीतही चांगले तग धरते..Milllet Diet: भरडधान्याचा आहारात वापर वाढवण्यासाठी 'वन मील अ डे विथ मिलेट्स'ची मोहीम.मध्यम जमिनीत, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत खरीप ज्वारी, राजगिरा, रागी/ नाचणी, कोदो मिलेट म्हणजेच कोदरा ही पिके चांगला उतारा देतात. खरीप ज्वारी पाण्याचा निचरा होणाऱअया मध्यम जमिनीत खरीप ज्वारीचे चांगले उत्पादन देते. नाचणी किंवा रागी हे पीक मध्यम जमिनीत चांगले वाढते आणि त्याच्या दाण्यांचा आकार आणि वजन वाढते..यंदा कमी पाणी, कमी खत आणि प्रतिकुल हवामानात भरडधान्य चांगली येत असली तरी शेतकऱ्यांना स्वत: त्याचे सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग करुन त्याची बाजारपेठ शोधायला हवी. मागणी चांगल्या प्रमाणात असल्याने स्वत:च्या मालाचे चांगले ब्रँडिंग शेतकऱ्यांनी केल्यास उत्पादनाचा योग्य बाजारपेठ आणि ग्राहक उपलब्ध होऊ शकतो.डॉ. आनंद गोरे, अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.