Koyna Dam News : कोयनेत गेल्यावर्षीपेक्षा १४ टक्के कमी पाणीसाठा धरणात एकूण ९०.४६ टीएमसी साठा

Koyna Dam Water Level : धरणाच्या दरवाज्यातून एकदाही पाणी सोडलले नाही. धरणात एकूण ९०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत १४.४७ टीएमसीने कमी आहे.
Koyna Dam
Koyna DamAgrowon
Published on
Updated on

Satara News : राज्याच्या वीज निर्मिती व सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाज्यातून एकदाही पाणी सोडलले नाही. धरणात एकूण ९०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत १४.४७ टीएमसीने कमी आहे.

जिल्ह्यातील अपुऱ्या पावसाच्या झळा शेतीसह धरणांना बसू लागल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात कोयनासह सर्व प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरून किमान दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्ग करावा लागतो. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वच धरणे जवळपास शंभर टक्के भरली होती. तसेच सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. मात्र यावर्षी अगदी उलट चित्र आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Koyna Dam
Girna Dam Water Level : ‘गिरणा’त ५६.७३ टक्केच पाणीसाठा

कोयना धरणात क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. जिल्ह्याच्या इतर भागांच्या तुलनेत धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने कोयनासह प्रमुख धरणांत ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी १८ ऑक्टोबर रोजी १०४.९३ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी मात्र धरणात ९०.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १४.४७ टीएमसी कमी पाणीसाठा आहे.

Koyna Dam
Ujani Dam Water Level : उजनीत ६० टक्के पाणी पातळी; आतापासूनच नियोजनाची गरज

या हंगामात कोयना धरणाचे दरवाजे एकदाही उघडण्यात आलेले नाहीत. पायथा वीज गृहातून मात्र पाण्याचा विसर्ग केला आहे. सप्टेंबरपासून सिंचनासाठी पाण्याची मागणी होऊ लागल्याने पाणी सोडावे लागले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून वीज निर्मिती व सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

कोयनाची दोन वर्षातील तुलनात्मक स्थिती

२०२३---२०२२

पाणीसाठा---९०.४६ 'टीएमसी---१०४.९३ टीएमसी

पाणी उंची---२१५२ फूट---२१६३ फूट

सिंचन पाणीवापर---५.१३ टीएमसी---४.२६ टीएमसी

एकूण पाण्याची आवक---१०६.६९ टीएमसी---१४६.७७ टीएमसी

विनावापर सोडलेले पाणी---०.०० टीएमसी---३०.४९ टीएमसी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com